Saturday, June 14, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

दौलताबाद किल्ल्याची संपूर्ण माहिती

Daulatabad Fort Information in Marathi

महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांची भूमी. येथे अनेक प्रसिद्ध किल्ले पाहायला मिळतात. उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रात सुमारे ३०० पेक्षा जास्त किल्ले आहेत. यांमध्ये अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड,  रामशेज गड आणि इतर किल्ल्यांचा समावेश होतो.

याच प्रसिद्ध किल्ल्यांमध्ये आणखी एक नाव म्हणजे दौलताबादचा किल्ला. याला देवगिरीचा किल्ला म्हणून देखील ओळखतात. औरंगाबाद जिल्ह्यात असणारा हा किल्ला इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. चला तर पाहू या दौलताबाद किल्ल्याची माहिती –

इतिहासाचा साक्षीदार असलेला दौलताबादचा किल्ला – Daulatabad Fort Information in Marathi

Daulatabad Fort Information in Marathi
Daulatabad Fort Information in Marathi

दौलताबाद किल्ल्याचा इतिहास – Daulatabad Fort History in Marathi

दौलताबादचा किल्ला यादव साम्राज्यातील महान राजे राजा भिल्लामराज यांनी हा ११८७ साली बांधल्याचे समजते. तेव्हा त्याचे नाव देवगिरी असे होते. १३२७ साली मुहम्मद बिन तुघलक याने आपली दिल्लीची राजधानी देवगिरी येथे हलविली आणि देवगिरीचे नाव दौलताबत असे बदलण्यात आले.

दौलताबाद किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे – Places to see on Daulatabad Fort

किल्ल्याची बांधणी भक्कम असून त्याला तीन पदरी सुरक्षात्मक घेरा आहे. या घेऱ्याला कोट असे म्हणतात. ज्यामध्ये कालाकोट, महाकोट आणि अंबरकोट यांचा समावेश आहे.

किल्ल्याचे प्रवेशद्वार भव्य असून त्यावर मोठ अनिदार खिळे पाहायला मिळतात. हत्तींनी दरवाज्याला धडाका मारून तोडू नये, यासाठी लढवलेली ही शक्कल. किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या तोफा बघायला मिळतात. ज्यामध्ये मेंढा तोफ खूप प्रसिद्ध आहे. ही तोफ म्हणजे भारतातील दुसरी सर्वात मोठी तोफ मानली जाते. मेंढीच्या आकाराचे तोंड असल्याने तिला मेंढा तोफ संबोधल्या जाते.

अल्लाउद्दिन बहमनी याने १४३५ साली हा किल्ला ताब्यात घेतला. आपल्या या विजयाची निशाणी म्हणून त्याने किल्ल्यावर चांद मिनार बांधले होते. हे मिनार अजूनही शाबूत आहे.

किल्ल्यावर चीनी महाल आहे. चीनी महाल म्हणजे औरंगजेबाचा कैदखाना. अतिशय मजबूत अशी ही इमारत सध्यस्थितीत मात्र काही प्रमाणात ढासळलेली दिसते.

दौलताबादची वास्तुकला – Daulatabad Fort Architecture

वास्तुकलेचा आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे दौलताबादचा किल्ला. गडाच्या भिंतींपासून ते प्रवेशद्वार आणि तोफखाना या सर्वांवर आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते. किल्ल्यावरील बुरुज आणि चांद मिनार हे देखील त्याकाळातील वास्तुकलेच्या सौंदर्याचे दर्शन घडवितात.

दौलताबाद जवळपासची प्रसिद्ध ठिकाणे : Near places to visit

१. बीबी का मकबरा, औरंगाबाद
२. अजंठा आणि एल्लोरा लेणी
३. घृष्णेश्वर महादेव मंदिर

दौलताबादला कसे जाल – How to reach Daulatabad Fort

औरंगाबाद पर्यंत बस, रेल्वे किंवा हवाई मार्गाने पोहोचल्या नंतर, येथून दौलाताबादसाठी बस, खाजगी वाहने उपलब्ध आहेत. औरंगाबादपासून सुमारे १६ किमी च्या अंतरावर दौलताबाद किल्ला आहे.

दौलताबाद किल्ल्या सुरु असण्याची वेळ – Daulatabad Fort Timings

हा किल्ला सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत. पर्यटकांसाठी खुला असतो. तसेच किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला काही प्रवेश शुल्क भरावा लागतो.

दौलताबाद किल्ल्याबद्दल काही महत्वाचे प्रश्न – Questions about Daulatabad Fort

१. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?

उत्तर: देवगिरी.

२. दौलताबादचा किल्ला कुणी बांधला? (Who Built Daulatabad Fort?)

उत्तर: यादव साम्राज्यातील महान राजे राजा भिल्लमराज.

३. दौलताबाद कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर: औरंगाबाद.

४. दौलताबादचा किल्ला सुरु असण्याची वेळ काय ?

उत्तर: सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

५. आपली राजधानी दिल्ली येथून दौलताबाद येथे कुणी हलवली ?

उत्तर: मुहम्मद बिन तुघलक.

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved