मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी

Pandurang Sadashiv Sane Guruji in Marathi

“शाम पायांना घाण लागू नये म्हणून एवढा जपतोस तसच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो”

साने गुरुजींच्या आईच्या तोंडचे हे शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले स्वतःत उतरवले आणि अखेरपर्यंत आचरणात देखील आणले  साने गुरुजींवर त्यांच्या आईच्या संस्कारांचा फार प्रभाव होता. श्यामची आई या त्यांनी आपल्या आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे पुढे कित्येक पिढ्यांकडे हे संस्कार हस्तांतरीत झालेले आपल्याला पहायला मिळाले.  पांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो…मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि स्वातंत्र्य सेनानी होते.

साने गुरुजी यांचा जीवन-परिचय – Sane Guruji Information in Marathi 

Sane Guruji Information in Marathi
Sane Guruji Information in Marathi

साने गुरुजी यांचा अल्पपरिचय – Sane Guruji Biography in Marathi 

नाव (Name) पांडुरंग सदाशिव साने
जन्म (Birth Date ) 24 डिसेंबर 1899
जन्मस्थान (Birthplace) पालगड जिल्हा रत्नागिरी
वडील (Father Name ) सदाशिव साने
आई (Mother Name) यशोदाबाई साने
चळवळ (Movement) भारतीय स्वातंत्र्य लढा
मृत्यू (Death) 11 जून 1950

साने गुरुजी यांचे जीवन – Sane Guruji History in Marathi

साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे 24 डिसेंबर 1899 ला  झाला.  साने गुरुजींच्या आजोबांच्या वेळी त्यांची परिस्थिती अत्यंत वैभवसंपन्न होती त्यांचे घराणे खोताचे काम करीत. पुढे वडील सदाशिवरावांच्या काळात मात्र आर्थिक परिस्थिती ढासळत गेली, एवढी की घरादारावरही जप्ती आली. त्यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा फार प्रभाव पडला. तिने केलेल्या संस्कारांमुळे साने गुरुजी घडले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर इथं प्रताप विद्यालयात त्यांनी शिक्षकाची नौकरी स्वीकारली. याठिकाणी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सांभाळतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली, विद्यार्थ्यांचे ते सर्वाधिक आवडते शिक्षक झाले. अमळनेर या ठिकाणी साने गुरुजींनी प्रताप तत्वज्ञान केंद्र इथं तत्वज्ञानाचा अभ्यास देखील केला.

1928 साली साने गुरुजींनी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरु केले. त्यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा फार प्रभाव होता. स्वतःच्या जीवनात देखील ते खादी वस्त्रांचाच वापर करीत असत. समाजातील जातीभेदाला, अस्पृश्यतेला, अनिष्ट रूढी परंपरांना साने गुरुजींनी कायम विरोध केला. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या साने गुरुजींनी 1930 साली शिक्षकाची नौकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत उडी घेतली. 

1942 च्या चळवळीमधे भूमिगत राहून सानेगुरुजीनी स्वातंत्र्याचा प्रचार केला. स्वातंत्र्य समरातील त्यांच्या सहभागामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. नाशिकला कारागृहात त्यांनी श्यामची आईचे लेखन पूर्ण केले, धुळे येथे कारागृहात असतांना साने गुरुजींनी विनोबा भावे यांनी सांगितलेली ‘गीताई’ लिहिली.

लहान मुलांच्या बाल मनावर चांगल्या संस्कारांची बीज पेरली जावीत म्हणून गुरुजींनी विपुल लेखन केलं. आपल्या आईवर त्याचं अत्यंत प्रेम होतं, हे त्यांनी लिहिलेल्या “श्यामची आई” या पुस्तकातून आपल्याला कळत, जाणवतं. श्यामची आई या पुस्तकातून त्यांनी आपल्या आईच्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत.  साने गुरुजींचं मन अत्यंत भावनाप्रधान आणि संवेदनशील होतं त्यामुळे आईने ज्या सदभावना त्यांच्यात रुजवल्या त्याची वाढ त्यांच्यात वेगानं झाली.

अमळनेर, धुळे आणि नाशिक इथं काही काळ त्याचं वास्तव्य होतं. पुढे खान्देशला त्यांनी आपली कर्मभूमी बनविलं. प्रांताप्रांतातील भेदभाव दूर व्हावा आणि सर्वत्र बंधूप्रेमाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी साने गुरुजींनी आंतरभारती ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. साहित्य संमेलनात तशी इच्छा त्यांनी बोलून देखील दाखवली होती.

त्याकरता त्यांनी पैसा गोळा केला होता, रवीन्द्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे विद्यार्थ्यांसाठी आंतरभारती संस्था स्थापन करण्याचा त्यांचा मनोदय होता.

साने गुरुजींचे निधन – Sane Guruji Death

11 जून 1950 रोजी साने गुरुजींचे निधन झाले.

बलसागर भारत होवो…विश्वात शोभूनी राहो

राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया हो…

या साने गुरुजींनी लिहिलेल्या कवितेने त्यावेळी नागरिकांवर प्रभाव वाढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकारने त्यांच्या काव्यपंक्ती देखील जप्त केल्या होत्या.

साने गुरुजींचे प्रकाशित साहित्य – Sane Guruji Books

  • अमोल गोष्टी
  • कर्तव्याची हाक
  • कला म्हणजे काय
  • आपण सारे भाऊ भाऊ
  • आस्तिक
  • इस्लामी संस्कृती
  • कल्की अर्थात संस्कृतीचे भविष्य
  • क्रांती
  • गुरुजींच्या गोष्टी
  • गीताहृदय
  • कला आणि इतर निबंध
  • ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठी भाषांतर
  • गोड गोष्टी
  • गोड शेवट
  • गोष्टीरूप विनोबाजी
  • श्यामची आई (Shyamchi Aai)
  • श्यामची पत्रे
  • सोनसाखळी व इतर कथा
  • स्वप्न आणि सत्य
  • स्वर्गातील माळ
  • सुंदर पत्रे
  • हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे
  • साधना – साप्ताहिक
  • सोन्या मारुती
  • रामाचा शेला
  • सती
  • संध्या
  • मानवजातीचा इतिहास
  • ते आपले घर
  • त्रिवेणी
  • धडपडणारी मुले
  • नामदार गोखले- चरित्र
  • विनोबाजी भावे
  • विश्राम

लक्ष्य दया: तुमच्या जवळ साने गुरुजी बद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हा “साने गुरुजी यांचा जीवन-परिचय – Sane Guruji Information in Marathi हा लेख आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला Share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुधा.

1 thought on “मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी”

  1. यक्षराज रामचंद्र पेंडसे

    गुरुजींच्या मृत्यू बद्दल बऱ्याच ठिकाणी एकच न पटणारी(खटकणारी) माहिती आढळते ती म्हणजे “गुरुजींनी आत्महत्या केली”. मी साने गुरुजींना वाचलंय आणि आणि तस जगण्याचा प्रयत्न देखील करतो.मला एवढंच वाटत की जे गुरुजी अद्वैताचे अधिष्ठान सांगतात,वर्णाश्रमधर्म शिकवतात,कर्माचा महिमा सांगतात आणि कर्मातून मुक्ती शिकवितात असे जबरदस्त विचारवंत आत्महत्या करूच शकत नाहीत.आणि केलीच खरोखरी तर कारण तरी काय असेल?असा प्रश्न पडतो .आणि मी मग स्वतःच स्वतः शी पुतपुटतो की हे शक्य नाही मला पटणारं नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top