“सत्येच्या वाटेवर” एक प्रेरणात्मक कविता

Marathi Poem Satyachi Vat

जीवनात लबाडीचा मार्ग सोडून जर सत्याचा मार्ग पकडला तर मनुष्य जीवन सार्थक होऊन जाते, त्यासाठी जीवनाला व्यतीत करत असताना आपण नेहमी सत्याच्या वाटेवर चालावे जेणेकरून आपल्याला कोणत्याही समस्सेला सामारे जायचे काम पडणार नाही, चला तर वळूया कवितेकडे…

“सत्येच्या वाटेवर” एक प्रेरणात्मक कविता – Marathi Poem Satyachi Vat

Satyachi Vat

सत्याच्या वाटेवर

काटे असती अमाप ।

चालणे होई कठीण

मोजता पुण्य आणि पाप।।

लबाडी पणा करूनी

कोणी स्वतः समजतो हुशार।

कर्माचे फळ मिळते

त्याने करावा हा विचार।।

चूक होणे मनुष्याची

ओळख देऊन जाते ।

प्रत्येक चूक मनुष्याला

नवीन काही शिकवून जाते।।

 सत्य कटू आहे

ते पचविण्यास ।

खोटे पण उघडे पडते

एकना एक दिवस।।

                              –युवाकवी

                            वैभव कैलास भारंबे.

 

जर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल तर तुम्हाला बर्यापैकी समस्यांना सामारे जावे लागत असेल.

पण विश्वास करा ह्याच मार्गावर ते सुखही लाभेल जे कधी अनुभवले नसेल, म्हणून सत्याची वाट न सोडता त्यावर चालत रहा.

आशा करतो माझी लिहिलेली Marathi Poem आपल्याला आवडली असेल आवडल्यास या कवितेला आपल्या मित्रांना तसेच परिवारातील सदस्यांना फेसबुक, Whatsapp, Instagram वर शेयर करायला विसरू नका.

मी आणखी अश्याच कविता आणि लेख आपल्यासाठी घेऊन येत राहील.

धन्यवाद आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. आमच्यावर असेच प्रेम करत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top