Trending
Home / Marathi Ukhane / नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+) | Marathi Ukhane For Groom

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन 100+) | Marathi Ukhane For Groom

New Marathi Ukhane For Groom

Marathi Ukhane For Groom

नवरदेवासाठी उखाणे / Marathi Ukhane For Groom

1) काही शब्द येतात ओठातून,
…… चं नाव येतं मात्र हृदयातून.

2) कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

3) भाजीत भाजी मेथीची,
……माझ्या प्रितीची.

4) पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक.

5) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

6) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप.

7) गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……. आहे माझी ब्युटी क्वीन.

8) संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

9) नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……..झाली आज माझी गृहमंत्री.

10) दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

11) मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

12) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

13) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

14) पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे,
………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.

15) ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

16) अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.

17) एक होती चिऊ, एक होता काऊ,
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

18) सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…………. चे नाव घेतो……..च्या घरात.

19) निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

20) चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

पुढील पानावर आणखी भरपूर मराठी उखाणे आहेत…

9 comments

 1. उपयोगी जानकारी है बहुत…
  और भी पढ़ें… Bhannaat.com,
  मोबाइल के लिए… digitechon.com

 2. Chlti hai gadi niklta hai dhur … Ke hath mai gulab ka full

 3. माझा आवडता ऋतू आहे वर्षा
  ही माझी अरची
  अन मी हीचा परश्या

 4. परातीत परात चांदीची परात,
  ….. लेक आणली मी ….. च्या घरात.

 5. Ya janmavar ya jagnyavar shatada prem karave,
  Ya janmavar ya jagnyavar shatada prem karave,
  ….. Ne mazya ayushyat ata rang bharave

 6. … te …perla lasun …aanal pickup madhi basun

 7. Datta U. Ekhande

  Shindya pasun tar palsha paryant perala lasun,
  …….. La anal gadhavar basun.

 8. Shweta subhash deshmukh

  1)निळ्या निळ्या आकाशातून विमान चालले फास
  …….च नाव घेतो तुमच्यासाठी खास

  2)आगीन गाडी चालते तेव्हा निघतो धूर
  च्यामारी …..आमची निघाली खूपच शूर

  3)गर्मीमध्ये ac लावल्यावर मिळते किती सुख
  ….माझी हसीना आणि मी तिचा हसमुख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *