एप्पल कंपनीच्या लोगो मध्ये अर्धे खाल्लेल सफरचंद का असते?

Apple Logo Story

जगातील टॉप कंपन्यांमधील एक कंपनी ती म्हणजे एप्पल आणि आपल्याला या कंपनीचे अनेक प्रोडक्ट बाजारात पाहायला मिळतात, स्मार्टफोन, घड्याळ, कॉम्प्युटर, लॅपटॉप, इत्यादी. आपण ह्या ब्रँड विषयी थोडक्यात का होईना कधी न कधी ऐकले असेलच की एप्पल ही एक खूप मोठी कंपनी आहे, जगात मिलियन डॉलर ची उलाढाल करते. तसेच आपल्या माहिती साठी या कंपनीचे प्रॉडक्ट्स बाजारातील प्रॉडक्ट्स पेक्षा किमतीने थोडेशे महाग असतात त्यामागे एक कारण आहे ते म्हणजे एप्पल एक लोकप्रिय ब्रँड आहे आणि या ब्रँड चे सर्वच प्रॉडक्ट्स हे उच्च दर्जाचे असतात, आणि म्हणून सुध्दा या सगळया प्रॉडक्ट्सची किमंत ही खूप मोठ्या प्रमाणात असते.

आपण पाहिले असेल की एप्पल कंपनीच्या सर्वच प्रॉडक्ट्स वर पाठीमागून एक अर्धे खाल्लेलं सफरचंद आपल्याला दिसून येत. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की एप्पल च्या लोगो विषयी माहिती की एप्पल चा लोगो हा असाच का ठेवण्यात आला? आशा करतो आपल्याला लिहिलेला लेख आवडणार तर चला पाहूया ..

म्हणून एप्पल कंपनीचा लोगो हा खाल्लेलं सफरचंद आहे – Story Behind the Apple Logo in Marathi 

Story Behind The Apple Logo
Story Behind The Apple Logo

एप्पल कंपनीची स्थापना कधी आणि कोणी केली होती? – Who was the Founder of Apple Company

एप्पल कंपनीची स्थापना एप्रिल १९७६ साली स्टीव जॉब आणि त्यांच्या मित्रांनी केली होती त्यांचे नाव होते स्टीव वोजनियाक आणि रोनाल्ड वेन. ही कंपनी सुरुवातीला पर्सनल कॉम्प्युटर बनवत होती. आणि १९७७ साली सुरुवातीला या कंपनीचे नाव एप्पल इंक (Apple Inc) म्हणून ठेवण्यात आले.

एप्पल चा पहिला लोगो – First Apple Logo

एप्पल चा पहिला लोगो हा आयझॅक न्यूटन यांचा फोटो होता. ज्यामध्ये आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले आहेत. आणि या लोगो ला तीन संस्थापकांपैकी रोनाल्ड वेन यांनी बनविला होता. पण ते कंपनीच्या सुरुवातीनंतर दोन आठवड्या मधेच त्यांनी त्यांचे पाय मागे घेतले. मग त्यानंतर कंपनी मध्ये स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोजनियाक. त्यांनी हा लोगो एक वर्ष तसाच ठेवला.

अर्धे सफरचंद एप्पल चा लोगो कसे बनले ? – Why is the Apple logo Half Cut

कंपनीला नवीन लोगो शोधताना एलन ट्यूरिंग यांचा कंपनीच्या काही लोकांना विचार आला. हे कॉम्प्युटर वैज्ञानिकांपैकी एक होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो देण्यात आला होता. तेव्हा अमेरिकेत होमोसेक्सुएलिटी एक अपराध मानल्या जातात होता, आणि एलन ट्यूरिंग हे त्यामध्ये अपराधी सापडले होते.

आणि त्यांचा इलाज करण्यासाठी त्यांना केमिकल ट्रीटमेंट म्हणून सायनाइड इंजेक्टेड एप्पल खायला देण्यात आले होते. त्या एप्पल ला खाल्ल्यानंतर एलन चा मृत्यू झाला होता. आणि त्यांच्या पार्थिवाजवळ सापडलेलं हे खाल्लेलं सफरचंद त्यांना श्रद्धांजली म्हणून हा लोगो दिल्या गेला त्यामध्ये पण एक गोष्ट त्यांनी पहिली की सफरचंद थोडेसे जरी कापल्या गेले तरी सुध्दा ते बदलत नाही. आणि तेंव्हापासून तर आतापर्यंत एप्पल चा हाच लोगो ठेवण्यात आला आहे.

तर वरील लेखात आपण पाहिले की एप्पल चा लोगो कसा ठेवण्यात आला, यर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा छोटासा लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला छोटासा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here