जगातील सर्वात विषारी वनस्पती, कोबरा सापाच्या विषापेक्षाही आहे खतरनाक

Giant Hogweed Most Poisonous Plant in the World

माणसाला जगायला ज्या ऑक्सिजन ची गरज आहे, तो ऑक्सिजन मुख्य स्वरूपाने झाडेच देतात. आपल्या आजूबाजूला हिरवळ असलेली कोणाला आवडत नाही. आपल्या आजूबाजूला हिरवी झाडे तसेच छोट्या छोट्या कुंडीत लावलेले झाडे आपल्याला आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात ठेवायला आवडतात.

एवढच नाही तर काही लोकांना तर आपल्या बेडरूम मध्ये सुद्धा एखाद छोटस रोपट ठेवायला आवडत. आणि ते त्यांच्या जागी योग्य सुद्धा असतात, हिरवळ असलेल रान ज्या प्रकारे माणसाच्या डोळ्यांना पाहावेसे वाटते,

त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला सुद्धा हिरवळ निर्माण करणारी झाडे असावी असे प्रत्येकाला वाटत, कारण त्यांच्या पासून आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, पण काही रोपटे किंवा वनस्पती आपल्या साठी हानिकारक सुद्धा बनू शकतात,

तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि अशी कोणती वनस्पती आहे, जी जगातील सर्वात विषारी वनस्पतींपैकी एक आहे, तर चला जाणून घेवूया कि कोणती वनस्पती जगातील सर्वात विषारी वनस्पती आहे.

जगातील सर्वात विषारी वनस्पती, कोबरा सापाच्या विषापेक्षाही आहे खतरनाक – Giant Hogweed Most Poisonous Plant in the World

Giant Hogweed Most Poisonous Plant in the World
Giant Hogweed Most Poisonous Plant in the World

जगातील सर्वात विषारी वनस्पती – Most Poisonous Plant in the World

जाइंट होगवीड हे जगातील सर्वात विषारी वनस्पती आहे, या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हेरॅकलियम मॅन्टेगाझियानम आहे, या झाडाला किलर ट्री  (Killer Tree) म्हणून सुद्धा ओळखल्या जात. कारण हे झाड कोबरा च्या विषापेक्षाही भयंकर आहे.

हि वनस्पती गाजराच्या जातीतील आहे, हि वनस्पती एवढी विषारी वनस्पती आहे, कि या झाडाला चुकूनही हाथ लागला तर हाताला फोडे येतात, या वनस्पतीचा दुष्परिणाम हाथ लावल्या पासून ४८ तासांमध्येच दिसतो,

दुष्परिणामांमध्ये आपली त्वचा आतून जळायला लागते. डॉक्टर या वनस्पतीवर बोलताना सांगतात कि या वनस्पती वर कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नाही आहे,

वनस्पती विषयी थोडक्यात – Giant Hogweed Plant

हि वनस्पती जास्तीत जास्त १४ फुट उंच असते, आणि दिसायला इतकी सुंदर कि कोणालाही या वनस्पतीला स्पर्श करावासा वाटेल, पण जर आपण या वनस्पती ला स्पर्श सुद्धा केला तर आपल्याला त्या वनस्पती मध्ये असलेल्या विषाचा सामना करावा लागू शकतो.

हि वनस्पती न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, मिशिगन, पेनसिल्व्हेनिया, ओहायो, मेरीलँड आणि हॅम्पशायर या शहरांमध्ये आढळून येते.

Giant Hogweed Burns
Giant Hogweed Burns

या वनस्पतीच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीच्या शरीरात एक प्रकारे जळजळ व्हायला लागते, कारण ह्या वनस्पतीचे विष कोबरा सापापेक्षा सुद्धा भयानक असते. आणि वर सांगितल्याप्रमाणे या वनस्पतीमुळे झालेल्या इन्फेक्शन वर कोणत्याही प्रकारचे यथोचित औषध बनले नाहीत.

सोबतच या वनस्पती च्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला बरेच दिवस सूर्यदेवाचे दर्शनही करता येत नाही, कारण सूर्याच्या संपर्कात हि व्यक्ती आली तर शरीरात जळजळ आणखी वाढणार. म्हणून या वनस्पतीला जगातील सर्वात विषारी वनस्पती (Most Poisonous Plant in the World) म्हटल्या जात.

आपल्याही आजूबाजूला अश्या काही वनस्पती असल्यास आम्हाला कळवा. आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here