Saturday, June 14, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

तुम्हाला माहिती आहे का गॅरंटी आणि वारंटी काय आहे

Guarantee Vs Warranty

आपण बाजारात काही वस्तूंना विकत घ्यायला गेल्यावर आपल्याला गॅरंटी आणि वारंटी हे  शब्द ऐकायला मिळतात, आणि ज्या वस्तूची गॅरंटी किंवा वारंटी जास्त असेल, त्याच प्रोडक्ट्स ना आपण जास्त करून खरेदी करतो.  गॅरंटी आणि वारंटी हे दोन्ही ही शब्द जवळ जवळ ऐकायला सारखेच वाटतात. पण या दोघांचा अर्थ वेगवेगळा आहे. काही लोक दोन्ही शब्दांना एकच समजतात, कारण या शब्दात समानता आहे. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत की गॅरंटी आणि वारंटी मध्ये काय फरक असतो, गॅरंटी आणि वारंटी चा फायदा घेण्यासाठी दुकानदारांकडून आपल्याला वारंटी कार्ड आणि गॅरंटी कार्ड ची आवश्यकता असते. पाहूया तर चला …

तुम्हाला माहिती आहे का गॅरंटी आणि वारंटी काय आहे  – Difference Between Guarantee and Warranty

Difference Between Guarantee and Warranty
Difference Between Guarantee and Warranty

गॅरंटी म्हणजे नेमकं काय असते? – What is Guarantee?

एखादी वस्तू दुकानातून विकत घेतल्यावर त्या वस्तूच्या एका ठराविक मुदतीच्या वेळेत (समजा एका वर्षात) ती वस्तू खराब झाल्यास दुकानदार किंवा कंपनी आपल्याला त्याच प्रकारची दुसरी वस्तू पहिल्या खराब झालेल्या वस्तूच्या मोबदल्यात देत असते याला आपण गॅरंटी म्हणत असतो. म्हणजेच एखादी जुनी वस्तू खराब झाली असल्यास त्याच्या मोबदल्यात नवीन वस्तू दिल्या जाणे म्हणजे गॅरंटी होय. गॅरंटी चे काही नियम आणि अटी असतात.

वारंटी म्हणजे नेमकं काय असते? – What is Warranty?

वारंटी म्हणजे दुकानातून एखादी गोष्ट विकत घेतल्यावर त्या वस्तूवर आपल्याला ऑफर दिल्या जाते की विकत घेतलेली वस्तू जर मुदतीच्या वेळात खराब झाली तर त्या वस्तूला दुरुस्त करून किंवा करवून दिल्या जाईल या दुरुस्त करून देण्याच्या कामाला वारंटी म्हटल्या गेलं आहे.

वारंटी चे सुध्दा काही नियम आणि अटी असतात.

यामध्ये आपल्याला जुनी वस्तू खराब झाल्यास नवीन वस्तू मिळत नाही, उलट त्याच वस्तूला दुरुस्त करून दिल्या जाते.

गॅरंटी आणि वारंटी मधील फरक – Difference Between Guarantee and  Warranty

  • वारंटी मध्ये विकत घेतलेल्या वस्तूला परत दुरुस्त करून मिळते पण तेच गॅरंटी असलेली वस्तू विकत घेतल्यास आणि खराब झाल्यास नवीन वस्तू मिळते.
  •  गॅरंटी मध्ये घेतलेल्या वस्तू ची कालमर्यादा कमी दिवस असते, आणि वारंटी मध्ये घेतलेल्या वस्तूची  कालमर्यादा जास्त दिवस असते.
  •  वारंटी ला थोडेशे जास्तीचे पैसे देऊन वाढविल्या जाते, पण गॅरंटीच्या बाबतीत असे होत नाही.
  •  वारंटी ही जवळ जवळ बऱ्याच गोष्टींना दिल्या जाते परंतु गॅरंटी काहीच वस्तूंवर दिल्या जाते.
  •  गॅरंटी आणि वारंटी ची एक ठराविक मुदत असते, आणि या दोन्ही गोष्टींसाठी नियम वेगळे असतात.

तर आजच्या लेखात आपण पाहिले की गॅरंटी आणि वारंटी मध्ये नेमका काय काय फरक असतो, आशा करतो आपल्याला समजला असेल आपल्याला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपण आपल्या मित्रांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, सोबतच अश्याच नवनवीन Quotes आणि लेखांसाठी जुळून रहा माझी मराठी सोबत. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Information

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकार कडून "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेची घोषणा करण्यात आली होती. लाडक्या बहीणींसाठी योजना तर आली,...

by Editorial team
July 18, 2024
मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती
Information

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण योजना” – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्य, पोषणात सुधारणा करण्याकरिता, त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आणि गरीब महिलांना मदत म्हणून महाराष्ट्र सरकार तर्फे "मुख्यमंत्री माझी...

by Editorial team
July 2, 2024
विटामीन्स आणि त्यांचे फायदे
Information

विटामीन्स आणि त्यांचे फायदे

Vitamin List and Their Benefits रोजच्या दैनदिन जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्या वरती बरच दुर्लक्ष आजकाल सर्व ठिकाणी आपण पाहतो कि...

by Editorial team
November 28, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved