• About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Thursday, August 11, 2022
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result
Home Slogans

आरोग्यावर घोषवाक्य – Health Slogans in Marathi

Health Slogans in Marathi

आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण खऱ्या अर्थाने आनंदी राहुन जीवनाचा परिपुर्ण आनंद घेऊ शकतो. आपलं आरोग्य स्वस्थ नसेल तर त्या जगण्याला अर्थ राहात नाही. एक स्वस्थ व्यक्तिमत्वच यशस्वी जीवनाची कल्पना करूं शकतो आणि देशाच्या उन्नतीत आपले योगदान देऊ शकतो.

एका स्वस्थ व्यक्तीचा सकारात्मक प्रभाव दुसऱ्या व्यक्तीवर पडतो तर एखाद्या अस्वस्थ आणि आजारी व्यक्तीला आपले आयुष्य व्यतीत करणेच कठीण होऊन बसते आणि पैसा धन जगातील ऐशोआराम त्याला निरर्थक वाटु लागतात.

म्हणुन प्रत्येकाला स्वस्थं जीवनाचं महत्व कळायला हवं! आज या ठिकाणी स्वास्थ्याप्रती जागरूक होण्याकरता आम्ही काही स्लोगन्स् उपलब्धं करून देत आहोत. यांना वाचुन आपण फिट राहायला हवं अशी भावना तुमच्यात नक्की जागृत होईल व आजार आपल्या आजुबाजुला देखील फिरकायला नको याकरीता आपण जागरूक व्हाल.

या स्लोग्नस् ला वाचुन जर तुमच्यात सकारात्मक भाव निर्माण झाले तर या स्लोगन्स् ना आपल्या परिवारात आणि सोशल मिडीयावर नक्की शेयर करा त्यामुळे जास्तीत जास्त लोक आपल्या आरोग्याप्रती जागरूक होतील आणि देशाच्या विकासात संपुर्णतः आपला सहभाग नोंदवतील.

आरोग्य घोषवाक्य – Health Slogans in Marathi

Quotes on Health in Marathi

उत्तम आरोग्य आणि आळस यापैकी एकाचीच निवड करा, आपल्या दिवसाची सुरूवात सकारात्मक विचारांनी करा.

Arogya vishayak Slogans

प्रथिनं कर्बोदकंयुक्त , पोषणमुल्यांनी भरलेलं अन्नं मुलांना द्या, सततचं जंक फुड आपल्या मुलांकरीता हानीकारक ठरत.

Arogya Ghosh Vakya Marathi

आपल्या चांगल्या आरोग्याची समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पडत असते, त्यामुळे चांगल्या आहार विहाराने स्वतःला नेहमी ताजेतवाने ठेवा.

Arogya Ghosh Vakya

पैशाच्या मागे लागुन आरोग्याची हेळसांड करू नकां, आपल्या आहाराकडे लक्ष द्या प्रकृती जपा.

Arogya Slogan

सुदृढ आरोग्याचे धनी व्हां! निरोगी आयुष्य जगण्याची गमंतच वेगळी आहे.

Arogya var Nare

निरोगी आरोग्य हीच आहे यशाची खरी गुरूकिल्ली, चांगले स्वास्थ्यं असेल तर दुर नही है दिल्ली.

Marathi Slogans on Health

आज घरात प्रत्येक कामाकरता यंत्र आले आहे आणि हे यंत्र आल्यामुळे घरातील शारीरीक मेहनतीची कामं बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहेत त्यामुळे याचा थेट परिणाम माणसाच्या स्वास्थ्यावर झालेला दिसुन येतो. अश्या परिस्थीतीत माणसाने स्वतःला मेंटेन करणं आणि तंदुरूस्त राहाण्याकरता व्यायाम करणे खुप आवश्यक आहे. तसे केल्याने व्यक्ती पुर्ण तऱ्हेने स्वस्थं राहु शकेल.

अधिकांश माणसे आळस, व्यस्तता आणि चुकीच्या दिनचर्ये मुळे रोज पायी फिरायला देखील जात नाहीत आणि योगा सुध्दा करत नाहीत. इतकेच नव्हें तर नौकरी करणारे पतीपत्नी वेळ मिळत नसल्याने घरी स्वयंपाक देखील करीत नाही आणि बाहेर काहीतरी खात राहातात. या अश्या राहाणीमानामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या आज माणसाला चिटकलेल्या आहेत. स्वास्थ्यासंबधीचे स्लोगन्स् व्यक्तीला स्वस्थ राहाण्याकरता साहाय्यक ठरतील आणि त्याचे प्रोत्साहन देखील वाढवतील.

Arogya vishayak Marathi Slogans

लहान मुलांना खेळण्याकरता आवर्जुन मैदानात जाण्याची सवय लावा, टिव्ही आणि मोबाईल पासुन दुर करून त्यांचे आरोग्य जपा.

Arogya vishayak Nare

घरात नेहमी स्वच्छतां ठेवा, उत्तम आरोग्याचा हा रामबाण उपाय आहे.

Health mantra in marathi

रात्री पिण्याच्या पाण्यात आठवणीने तुरटी फिरवा आणि सकाळी उठुन तेच पाणी प्या.

Health Quotes in Marathi

तुमच्याजवळ संपत्तीचा बॅंकबॅलेन्स नसला तरी चालेल, पण आरोग्याचा बॅंकबॅलेन्स असेल तर तुम्ही सर्वात सुखी आहात.

Health Quotes

ज्या व्यक्तिला जीवन जगतांना महिन्याकाठी औषधाचा खर्च करावा लागत नाही, त्याच्यासारखा भाग्यवंत या भुतलावर दुसरा कुणीही नाही.

Health Slogans in Marathi

स्वस्थ राहा आणि घरात तयार केलेलेच अन्न सेवन करा, ताज्या फळांचा आणि स्वच्छ भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करा.

Health Slogans

जेवणापुर्वी हात साबणाने स्वच्छं धुवां, हात न धुतां जेवण केल्यास, डोळयांनी न दिसणारे कित्येक किटाणु हाताव्दारे आपल्या पोटात जातात.

Health Status in Marathi

कायम व्यस्त राहाल एवढे काम करा नेहमी मस्त राहाल इतका पैसा कमवा आणि कायम स्वस्थ राहाल इतका व्यायाम करा.

Slogans on Health in Marathi

चांगले आरोग्य आपल्याकरीता किती महत्वपुर्ण आहे हे माहीत असुन देखील कित्येकजण आपल्या आरोग्याप्रती बेजवाबदारीने वागतात. पैशाच्या मागे लागुन व्यक्ती आपल्या आरोग्याकडे पुर्णतः दुर्लक्ष करतो. वेळेवर जेवत नाही, योग आणि व्यायामाच्या महत्वाकडे लक्षं देत नाही. बाहेरील जंकफुड खाऊन आपलं आरोग्य पुर्णपणे नष्ट करतात परिणामी अशी माणसं कित्येक रोगांनी ग्रासली जातात.

यामुळे त्यांच्यात आपल्या आयुष्याविषयी नकारात्मकता निर्माण होते आणि हळुहळु अश्या लोकांच्यात आयुष्य जगण्याची आस संपते. ही माणसं आपल्या आजुबाजुच्या वातावरणाला देखील नकारात्मक बनवतात. अशी परिस्थीती उद्भवु नये याकरीता स्वतःला फिट ठेवणे खुप आवश्यक आहे. स्वास्थ्यावर लिहीलेली स्लोगन्स् आणि नारे तुम्हाला स्वस्थं राहाण्याकरीता नक्की मदत करतील आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या जिवनात आपल्या ध्येयाला सहज प्राप्त कराल.

Health Status

आरोग्यलाभ जर शरीराला नाही तर जवळचा पैसा काहीच उपयोगाचा नाही, स्वतःला निरोगी ठेवणं म्हणजे परमेश्वराची सेवा करणं होय.

Marathi Arogya suvichar

पोषक जेवणाच्या अभावाने शरीरावर दुष्परीणाम संभवतात, रोजच्या जेवणात पोषक तत्वांचा समावेश आवर्जुन करा.

Marathi Slogans on Health

उत्तम स्वास्थ्याचं मोल कुणीही चुकवु शकत नाही, चांगलं स्वास्थ्य तर अनमोल असतं.

Quotes on Health

माणसाचे सगळयात महत्वाचे धन हे उत्तम आरोग्य आहे, आरोग्याशिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे.

Shayari on Health in Marathi

स्वास्थ्याला द्या तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिला क्रमांक,गोळया औषधांकरता लक्षात ठेवावी लागणार नाही वेळ आणि दिनांक….

Shayari on Health

आवडता खेळ खेळा आणि स्वास्थ्य टिकवां.

Slogans on Health in Marathi

जेव्हां स्वस्थं राहील इंडिया तेव्हांच पुढे जाईल इंडिया.

Slogans on Health

माणुस आरोग्याची हानी करून पैसा कमावतो आणि पुढे कमावलेला पैसा बिघडलेल्या स्वास्थ्यावर खर्च करतो.

Read More:

Slogans in Marathi

लक्ष्य दया: तुमच्या जवळ आणखी Health Slogans In Marathi असतील तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please: आम्हाला आशा आहे की हे आरोग्यावर घोषवाक्य तुम्हाला आवडले असतीलच…. जर खरच आवडले असतील तर मग facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarati.com चे facebook page लाइक करा.

नोट: या लेखात दिलेल्या माहितीबद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.

Editorial team

Editorial team

Related Posts

Mahila Sashaktikaran Slogan
Marathi Slogans

महिला सशक्तीकरणावर स्लोगन

Mahila Sashaktikaran Slogan एके काळी महिलांना फक्त चूल आणि मुल पर्यंतच सीमित ठेवलेले होते पण आजच्या काळात असे कोणतेच क्षेत्र...

by Editorial team
March 8, 2022
Save Earth Images
Slogans

वसुंधरेच्या सुरक्षासंबंधी काही महत्वपूर्ण घोषवाक्य

Save Earth Slogans in Marathi पृथ्वी हा एक असा ग्रह आहे ज्यावर जीवन संभव आहे. या पृथ्वीवर मानवाच्या जगण्याकरीता पर्याप्त...

by Editorial team
September 7, 2020
Facebook Twitter

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved