हि आहे जगातील पहिली घड्याळ…

Worlds Oldest Pomander Watch 1505 in Marathi 

जुन्या काळात वेळ समजण्यासाठी लोक सुर्यामुळे पडणाऱ्या स्वतःच्या सावलीची मदत घेत असत. जेव्हा आपली सावली आपल्या पायापर्यंत पोहचणार तेव्हा दुपारचे १२ वाजले अशी समज होती. आणि बरेच लोक त्यावरच विश्वास ठेवुन चालत असत. पण त्यावेळेस काही श्रीमंत लोक होते जे घड्याळ वापरत होते आणि घड्याळाच्या साहाय्याने तेव्हा वेळ पाहत असत. आता जरीही घड्याळाला लोक वापरत नसतील पण तेव्हा घड्याळ असणे म्हणजे एक वेगळीच शान मानल्या जायची.

आपण घड्याळाला पाहिल्या नंतर आपल्याला एवढं आश्चर्य होत नसेल पण बरेचदा किंवा एखाद्या वेळेस आपल्याला काही प्रश्न पडले असतील की जगातील सर्वात पहिली घड्याळ कशी असणार?  त्याचा वापर कसा होत असणार? तर काळजी नका करू आजच्या लेखात आपण या सर्व गोष्टींविषयी पाहणार आहोत की जगातील सर्वात पहिली घड्याळ कशी होती? तर चला पाहूया.

हि आहे जगातील पहिली घड्याळ – Worlds First Worlds Oldest Pomander Watch 1505 in Marathi

Pomander Watch
Pomander Watch

या जगातील सर्वात आधी बनलेल्या घड्याळाला “पोमेंडर वॉच १५०५ “असे म्हटल्या जातं. या घड्याळाला १५०५ म्हणून सुध्दा ओळखल्या जातं. या घड्याळाचा सर्वात आधी जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेनलेन यांनी शोध लावला होता. पीटर हेनलेन यांनी आज पासून कमीत कमी ५१५ वर्षांआधी या घड्याळाचा शोध लावला होता. म्हणजेच या घड्याळाला सर्वात आधी १५०५ मध्ये पाहिल्या गेलं होत. म्हणून या घड्याळाला या वर्षाच्या नावाने सुध्दा ओळखल्या जात.

आता आपण म्हणणार की ही घड्याळ जगासमोर आताच्या काळात कशी समोर आली तर आपल्या माहिती साठी या घड्याळाला जगासमोर येण्याची एक गमतीदार स्टोरी आहे, १९८७ साली एका घड्याळ बनविणाऱ्या मुलाने एका जुन्या वस्तू विकणाऱ्या मार्केट च्या एका दुकानातून या घड्याळाला विकत घेतले. त्याने या घड्याळाला फक्त १० पाउंड मध्ये विकत घेतले होते म्हणजेच आजचे ९४७ रुपये. पण त्याला ही गोष्ट माहिती नव्हती की ही जगातील सर्वात पहिले बनलेले घड्याळ आहे.

त्याने त्या घड्याळाला बरेच वर्ष स्वतःजवळ ठेवले व त्याला त्या घड्याळाविषयी माहिती नव्हती म्हणून त्याने त्या घड्याळाला एका व्यक्तीला विकून टाकले. तेही स्वस्त दरात. ज्या व्यक्तीला ही घड्याळ विकली होती त्यालाही ह्या घड्याळा विषयी काही माहिती नव्हते. त्याने सुध्दा तेच केले त्याने सुध्दा या घड्याळाला विकून टाकले पण त्याने ज्या व्यक्तीला ही घड्याळ विकली होती तो एक रिसर्च करणारा विध्यार्थी होता.

जेव्हा ही घड्याळ त्याच्या जवळ आली तेव्हा त्याने त्या घड्याळाला व्यवस्तीत रित्या पाहिले त्यांनंतर त्याच्या निदर्शनास आले की त्या घड्याळ वर कोणाची तरी सही आहे आणि त्या घड्याळाचे निर्मिती वर्ष आहे. त्याने रिसर्च केली तेव्हा त्याला कळले की त्या घड्याळावर असणारी सही ही पीटर हेनलेन यांची आहे, त्या घड्याळाला ते स्वतः वापरत असतं.आणि नेहमी त्यांच्या जवळ ठेवत असत.

या घड्याळावर जेव्हा त्या मुलाने रिसर्च केले तेव्हा समोर आले की या घड्याळाला तांबे आणि सोने या धातूंचा वापर करून बनविल्या गेले आहे. अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने २०१४ मध्ये या घड्याळाच्या किमंत चे अनुमान लावले होते तेव्हा या घड्याळाची किंमत ५० ते ८० मिलियन डॉलर म्हणजे आजचे ३८० ते ६१५ करोड रुपये एवढी असण्याची शक्यता आहे. म्हणजेच या घड्याळाला विकून एखादे शहर सुध्दा विकत घेता येणार.

तर हा छोटासा लेख जगातील सर्वात आधी बनलेल्या घड्याळा विषयी होता, आशा करतो आपल्याला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here