तामीळनाडु राज्यात साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव “पोंगल” या सणाची संपूर्ण माहिती

Pongal Festival  in Marathi

पोंगल हा भारतातील तामीळनाडु राज्यात साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव आहे. तमिळ हिंदु समाजात या सणाचे विशेष महत्व दिसुन येते.

जानेवारी महिन्यातील 14 किंवा 15 तारखेला हा सण साजरा केल्या जातो. महाराष्ट्रात या सुमारास मकर सक्रंातीची धुम असते. उत्तर भारतात लोहढी साजरी होते आणि याच दिवसांमधे साजरा होते तामिळनाडु राज्यातील पोंगल.

Pongal Festival in Marathi

तामीळनाडु राज्यात साजरा होणारा एक महत्वाचा उत्सव “पोंगल” या सणाची संपूर्ण माहिती – Pongal Festival Information in Marathi

उत्तर भारतात ज्याप्रमाणे नववर्षाची सुरूवात चैत्र प्रतिपदेपासुन करण्यात येते त्याच प्रकारे दक्षिण भारतात सुर्याच्या उत्तरायणात पोंगल सणापासुन नववर्षाचा आरंभ होतो.

पौराणिक कथा

भगवान शंकरांनी एकदा आपल्या वसव बैलाला पृथ्वीवर जाऊन संदेश देण्यास सांगीतले. तो संदेश असा होता… मनुष्याने रोज अंगाला तेल लावुन स्नान करावे आणि महिन्यातुन एकदा भोजन करावे. वसव बैलाने पृथ्वीवर उलटा संदेश दिला रोज भोजन करावे आणि महिन्यातुन एकदा तेल लावुन स्नान करावे यामुळे भगवान शिव का्रेधीत झाले आणि त्यांनी बैलाला शाप दिला तु कायमचा पृथ्वीवर जा आणि यापुढे मनुष्याला शेतीत मदत कर… या शापामुळे बैलाला पृथ्वीवर कायमचा मुक्काम करावा लागला.

या उत्सवाशी निगडीत एक पौराणिक कथा कृष्ण आणि इंद्रदेवाशी संबधीत आहे

देवतांचे राजा झाल्यानंतर इंद्रदेव फार अभिमानी झाले त्यांचा गर्वाभिमान दुर करण्याकरीता भगवान कृष्णांनी एक युक्ती केली आपल्या गोकुळातील नागरीकांना इंद्र देवतेची पुजा करण्यापासुन रोखले. त्यामुळे इंद्रदेव रागावले त्यांनी सतत 3 दिवस गोकुळावर प्रचंड पाऊस पाडला.

या पाऊसामुळे संपुर्ण व्दारका संकटात सापडली त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी सगळयांच्या संरक्षणासाठी आपल्या एका करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला आणि समस्त प्राणीमात्रांना आश्रय दिला. इंद्रदेवांना आपली चुक उमगली आणि श्रीकृष्णाचे श्रेष्ठत्व सुध्दा लक्षात आले. भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्माला सांगुन व्दारकेचे पुनर्निर्माण करवीले व गोकुळ वासीयांनी आपल्या गायी आणि बैलांच्या मदतीने पुन्हा शेती पिकवली…..

पोंगल सणाचा संबंध कृषी आणि शेतीशी निगडीत आहे. पिकपाणी चांगले झाल्यास हा सण उत्सव अत्यंत हर्षोल्हासात साजरा करतात. हा सण जवळजवळ 4 दिवसांपर्यत साजरा केला जातो आणि चारही दिवसाचे आपापले महत्व आहे.

  1. भोगी पोंगल
  2. थाई पोंगल
  3. मट्टू पोंगल
  4. कान्नुम पोंगल

1) भोगी पोंगल:

इंद्र देवतेला प्रसन्न करण्याकरता पोंगल चा हा पहिला दिवस साजरा होतो. शेतकरी बांधवांकरता पाऊस अत्यंत महत्वाचा आहे आणि इंद्र देवता पावसाची आणि आकाशाची देवता म्हणुन ओळखली जाते त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्याकरता आणि त्यांचे आशिर्वाद प्राप्त करण्याकरता पृथ्वीतलावर समृध्दी आणणाऱ्या इंद्र देवतेची प्रार्थना करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

या दिवशी घराची स्वच्छता केल्यानंतर सायंकाळी गवऱ्या आणि लाकडाने आग पेटवली जाते आणि त्यात घरातील महिला जुन्या आणि कामात नसलेल्या वस्तु टाकुन देतात. या शेकोटी भवती महिला गाणे गात नृत्य करतात. या दिवसांमधे थंडी असल्याने देखील या आगीचा उपयोग लोकांना उष्णता प्रदान करण्याकरीता सुध्दा होतो.

2) थाई पोंगल:

पोंगल च्या या दुसऱ्या दिवशी मातिच्या भांडयात नवे तांदुळ, नवा गुळ आणि दुधाला एकत्र शिजवुन सुर्यदेवतेला नैवेद्य दाखविला जातो. या पदार्थात इलायची, किसमिस, हिरवा हरभरा, आणि काजु देखील टाकतात. हा पदार्थ घराच्या अंगणात सुर्यादेवते समोर तयार करण्यात येतो.

या व्यतिरीक्त ऊस नारळ आणि केळाचा देखील नैवेद्य दाखविला जातो.

या दिवशी घरातील स्त्रिया माती आणि शेणाने सारवलेल्या भिंतींवर चुन्याने परंपरागत रांगोळया काढतात. याला शुभ समजल्या जाते. सकाळी उठल्याबरोबर स्नान करून स्त्रिया या रांगोळया घरातील भिंतीवर काढतात. संध्याकाळी सर्व एकत्र येउन शिजविलेल्या तांदळाचे सेवन करतात.

3) मट्टू पोंगल:

पोंगल चा तिसरा दिवस गायी आणि बैलांना समर्पित असतो. गायीचे दुध सर्वांकरीता अमृतासमान असते आणि बैल शेतकऱ्यासमवेत दिवसरात्र कष्ट करतात त्यामुळे या दोघांचे पुजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी भगवान शंकरांनी आपल्या बसव बैलाला शाप दिल्याने त्याला कायम स्वरूपी पृथ्वीवर वास करावा लागला त्यामुळे बैल शेतीच्या, धान्याची ने आण करण्याकरता उपयोगात येतात. त्याच्या प्रती उतराई होण्याकरता मट्ठू पोंगल हा दिवस साजरा होतो.

4) कान्नुम पोंगल…पोंगल चा अखेरचा दिवस:

हा दिवस पोंगल चा शेवटचा दिवस असतो या दिवशी चार दिवसात उरलेल्या पदार्थांना विडयाचे पान ऊस आणि सुपारी घेउन हळदीच्या पानावर घराबाहेर अंगणात ठेवल्या जाते. या दिवशी कन्यापुजन देखील केले जाते.

घरातील महिला चुन्याचा दगड, हळद, तेल आणि तांदुळ हे घेउन आपल्या भावाला ओवाळतात व त्यांच्या सुख समृध्दीची कामना करतात. त्यानंतर सर्वजण एकत्र येत आनंदाने जेवण करतात.

Read More:

लक्ष्य दया :- तुमच्या जवळ आणखी पोंगलबद्द्ल माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

Please :- आम्हाला आशा आहे की हा पोंगल / Pongal Festival Information in Marathi  तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडले असतील तर मग Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook page लाइक करायला सुधा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here