जाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

27 September Dinvishes

मित्रांनो, आज २७ सप्टेंबर,  हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यात येतो याची सुरुवात सन १९८० सालापासून युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन केली.  या दिवशी हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे  संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना सन २७ सप्टेंबर १९७० साली या दिवशी झाली होती.

याशिवाय, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २७ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 27 September Today Historical Events in Marathi

27 September History Information in Marathi
27 September History Information in Marathi

२७ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 September Historical Event

  • सन १९०५ साली महान वैज्ञानिक अल्बर्ट आंइस्टीन(Albert Einstein) यांनी E= mc२ चा सिद्धांत सादर केला.
  • सन १९२५ साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
  • सन १९५८ साली भारतीय जलतरण पटू मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे  पहिले आशियाई जलतरणपटू बनले.
  • सन १९८० साली युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन ने २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात केली.
  • ४ सप्टेंबर १९९८ साली निर्मित गुगल ने सन २००६ सालापासून २७ सप्टेंबर या दिवशी आपला जन्मदिन साजरा करण्यास सुरुवात केली.

२७ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०७ साली महान भारतीय क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्मदिन.
  • सन १९०७ साली भारतीय संगीत समीक्षक, संगीतशास्त्रज्ञ आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या विषयाचे प्रख्यात लेखक वामनराव देशपांडे यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट दिग्दर्शक व निर्माता तसचं, यशराज फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती व वितरण कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, यशराज चोप्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९५३ साली भारतीय हिंदू अध्यात्मिक नेते, गुरू आणि मानवतावादी माता अमृतानंदमाया देवी यांचा जन्मदिन.
  • सन १९८१ साली भारतीय क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मीपती बाळाजी यांचा जन्मदिन

२७ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 September Death / Punyatithi / Smrutidin

  • इ.स. १८३३ साली थोर भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो सभेचे संस्थापक राजा राम मोहन रॉय यांचे निधन.
  • सन १९२९ साली महराष्ट्रीयन काळ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शिवराम महादेव परांजपे यांचे निधन.
  • सन १९७२ साली महान भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन.
  • सन १९७५ साली भारतीय रसायनशास्त्रज्ञ, शैक्षणिक, लेखक आणि दिल्ली विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग प्रमुख तिरुवेंकट राजेंद्रराम शेषाद्री यांचे निधन.
  • सन १९९२ साली सुप्रसिद्ध सामजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ समाजसेविका अनुताई वाघ यांचे निधन
  • सन २००४ साली पद्मभूषण पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय शैलीतील प्रसिद्ध भारतीय गायिका शोभा गुर्तू यांचे निधन.
  • सन २००८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here