जाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष

29 September Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक घटनांची माहिती सांगणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं, निधन पावणाऱ्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. हा लेखक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याने आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.

मित्रांनो, आज जागतिक हृदय दिन.  जगात दरवर्षी लाखो लोक ह्र्द्यविकाराने मरण पावतात. लोकांमध्ये हृदया विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी वर्ल्ड हार्ट फेडरेशन सन २००० साली या दिनाची सुरुवात केली. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या मतानुसार जगात सर्वात जास्त मृत्यू हे हृदय विकारामुळे होतात. आपल्या देशांत सुमारे एक करोड पेक्षा जास्त लोक हृदय विकाराने त्रस्त असून दरवर्षी पंचवीस लाख लोकांचा मृत्यू हा हृदय विकारामुळे होतो.

जाणून घ्या २९ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 29 September Today Historical Events in Marathi

29 September History Information in Marathi
29 September History Information in Marathi

२९ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 29 September Historical Event

  • इ.स. १८३६ साली मद्रास चैंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीची स्थापना करण्यात आली.
  • इ.स. १८८५ साली जगातील पहिला पब्लिक इलेक्ट्रिक ट्राम वे इंग्लंड मध्ये सुरु करण्यात आला.
  • सन १९६२ साली कलकत्ता शहरात एम एल दालमिया कंपनीतर्फे आशिया खंडातील पहिले तारांगण बिर्ला तारांगण सुरु करण्यात आलं.
  • सन २००१ साली सयुक्त राष्ट्राने अमेरिकेचा आतंकवाद विरोधी प्रस्ताव पारित केला.
  • सन २०१२ साली  अल्टमास कबीर यांनी भारताचे ३९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • सन २०१४ साली समलिंगी जोडप्यांचा पहिला विवाह इंग्लंड आणि वेल्समध्ये पार पडला.

२९ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 September Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०१ साली नोबल पारितोषिक विजेते इटालियन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी(Enrico Fermi) यांचा जन्मदिन. यांनी न्युट्रॉनच्या कणांचे संशोधन केले.
  • सन १९२८ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय राजकारणी व राजनीतिकतज्ञ तसचं, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते व हास्य कालालकर, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक मेहमूद अली यांचा जन्मदिन.
  • सन १९३२ साली भारतीय महाराष्ट्रीयन समाजसुधारक, विचारवंत कार्यकर्ते आणि मराठी भाषिक लेखक तसचं, मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली नोबल पारितोषिक विजेता पोलंड राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्मदिन.
  • सन १९७८ साली निवृत्त अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्मदिन.

२९ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 29 September Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१३ साली डिझल इंजिनाचा शोध लावणारे महान जर्मन यांत्रिक अभियंता व संशोधक रुडॉल्फ डीझल (Rudolf Diesel) यांचे निधन.
  • सन १९४२ साली भारताच्या स्वातंत्र्या करिता आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर भारतीय क्रांतिकारक महिला मातंगिनी हाजरा यांचे निधन.
  • सन २००४ साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय मल्याळम भाषिक कवयित्री बालमणी अम्मा यांचे निधन.
  • सन २०१७ साली अमेरिकन वंशीय भारतीय चित्रपट अभिनेते व दूरदर्शन कलाकार टॉम आल्टर(Tom Alter) यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here