• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Why the conch is not blown in Badrinath Temple

बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा

July 29, 2020
How Astronauts Live In Space

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

January 22, 2021
22 January History Information in Marathi

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 22, 2021
What to Know Before Investing

गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या…

January 21, 2021
21 January History Information in Marathi

जाणून घ्या 21 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 21, 2021
Ramacha Palna

प्रभू श्रीरामचंद्रांचा पाळणा संग्रह

January 20, 2021
20 January History Information in Marathi

जाणून घ्या 20 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 20, 2021
Good thoughts in Marathi

100+ सर्वश्रेष्ठ छान-सुंदर विचार

January 19, 2021
19 January History Information in Marathi

जाणून घ्या 19 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 19, 2021
Dattacha Palana

दत्ताचा पाळणा संग्रह

January 18, 2021
Morning Habits to Start the Day Right

या चांगल्या गोष्टी अवलंबल्याने होईल आपल्या दिवसाची सुरुवात उत्तम

January 18, 2021
18 January History Information in Marathi

जाणून घ्या 18 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

January 18, 2021
Balapur Fort Information in Marathi

इतिहासाचा वारसा लाभलेला वऱ्हाड प्रांतातील बाळापुर किल्ला

January 18, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, January 22, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा

Badrinath Temple in Marathi 

बद्रीनाथ यात्रा, बद्रीनाथ मंदिर या विषयी आपण बरेच वेळा टीव्ही चॅनल वर किंवा आणखी काही ठिकाणी ऐकत असतो, बद्रीनाथ या ठिकाणाला हिंदू धर्मात एक विशेष महत्व दिलेलं आहे, आपण नेहमी चार धाम यात्रा ह्या विषयी ऐकलेल असेल त्या चार धाम पैकी एक म्हणजे बद्रीनाथ. देशातील चार पवित्र ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे बद्रीनाथ. हे भगवान विष्णू यांचे धाम आहे.

तसे पाहिले तर प्रत्येक मंदिरामध्ये पूजेच्या वेळी शंख वाजविला जातो. आणि पूजा केली जाते. पण देशातील हे एकमेव मंदिर आहे जिथे पूजेलाच नाही तर तसेही शंख वाजविला जात नाही. यामागे एक पौराणिक कथा आहे, बरेच जणांना या रहस्यमय कथेविषयी माहिती नाही आहे, तर आपण आजच्या लेखात ती पौराणिक कथा पाहणार आहोत, तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडणार. तर चला पाहूया.

बद्रीनाथ मंदिरात कधीही शंख का वाजविला जात नाही? यामागे आहे एक पौराणिक कथा – Why the conch is not blown in Badrinath Temple

Why the conch is not blown in Badrinath Temple
Why the conch is not blown in Badrinath Temple

बद्रीनाथ मंदिरा विषयी थोडक्यात माहिती – Badrinath Temple Information in Marathi

बद्रीनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील चामोली जवळील अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं हे एक प्राचीन मंदिर आहे. आणि या मंदिराचे बांधकाम जवळजवळ सातव्या किंवा नवव्या शतकात झालेले असल्याचे काही प्रमाण मिळतात. देशातील चार धाम च्या यात्रांपैकी एक ठिकाण म्हणजे बद्रीनाथ. आणि येथे वर्षातून लाखो भाविक दर्शनासाठी संपूर्ण भारतातून येतात. म्हणजेच हे ठिकाण नेहमी भाविकांनी भरलेलं असतं. आणि बद्रीनाथाचे दर्शन घेण्यासाठी हजारो किलोमीटर चा प्रवास करून भाविक येथे पोहचतात.

या मंदिरामध्ये भगवान बद्रीनारायण यांची १ मीटर(३.३ फूट) एवढी लांब मूर्ती पहायला मिळते. असे म्हटले जाते की शिव चा अवतार मानल्या जाणारे आद्य शंकराचार्य यांनी ही मूर्ती आठव्या शतकात जवळच असलेल्या नारद कुंडातून काढून मंदिरात स्थापित केली होती. असेही म्हटले जाते की ही मूर्ती पृथ्वीवर आपोआप प्रगट झाली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत ती मूर्ती तेथे स्थित आहे.

शंख न वाजविण्या मागे कोणती पौराणिक कथा आहे? – History of Shank (CONCH SHELL)

एके काळी हिमालयात राक्षसांचा दरारा होता. आणि ते तेथील सर्व लोकांना त्रास देत असतं विशेषकरून ते साधू मुनी या सर्वांना विनाकारण त्रास देत असतं. तेव्हा साधू मुनींना आपल्या आश्रमात किंवा मंदिरात राहूनच देवाची पूजा अर्चना करावी लागत असे. पण तरीही ते राक्षस साधू मुनींना त्रास देणे सोडत नसत. आणि त्यांनाच आपले भोजन बनवत असतं, या सगळ्या त्रासाला कंटाळून एक दिवस ऋषी अगस्त्य यांनी माता भगवती यांना मदतीसाठी पुकारले. त्यानंतर माता भगवती आपल्या कुष्मांडा देवी च्या अवतारात प्रगट झाल्या आणि त्रिशूलाने आणि तलवारीने सगळ्या राक्षसांचा विनाश करण्यास सुरुवात केली.

सगळ्या राक्षसांचा विनाश केल्या गेला, परंतु दोन आतापी आणि वातापी हे दोन राक्षस मातेचा राग पाहून भीतीने पळून गेले. आणि यापैकी आतापी राक्षस मंदाकिनी नदी मध्ये जाऊन लपून राहिला आणि वातापी राक्षस बद्रीनाथ धाम मध्ये जाऊन शंखामध्ये  लपून राहिला. आणि तेव्हापासून बद्रीनाथ मध्ये शंख वाजविला जात नाही. आणि ही प्रथा आजही अशीच्या अशी पाळल्या जाते.

वरील लेखात आपण पाहिले की बद्रीनाथ धाम मध्ये शंख का वाजविला जात नाही, आणि आपल्याला या लेखातून हे उत्तर सुध्दा मिळाले असेल तर आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असणार आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

Related Posts

How Astronauts Live In Space
Information

तुम्हाला माहित आहे का? अंतराळवीर अवकाशात कसे राहत असतील?

Living in Space मित्रहो, अवकाश म्हटल म्हणजे आपल्या समोर बरेच प्रश्न येतात. जसे, कसे असेल तिथले वातावरण?  पृथ्वीच्या बाहेर जीवन...

by Editorial team
January 22, 2021
22 January History Information in Marathi
History

जाणून घ्या 22 जानेवारी रोजी येणारे दिनविशेष

22 January Dinvishesh २२ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या...

by Editorial team
January 22, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2020 MajhiMarathi.Com

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2020 MajhiMarathi.Com