या बॉलिवूड अभिनेत्रींच्या मृत्यूचे रहस्य अजूनही रहस्यच आहे. जाणून घ्या या लेखातून

Mysterious Deaths in Bollywood

देशात बॉलिवूड च्या कलाकारांना खूप पसंत केल्या जात, आणि प्रत्येकालाच बॉलिवूड कलाकारांविषयी जाणून घेण्यात रुची असते, जसे त्यांची लाईफ स्टाईल, त्यांचे इन्कम पण आपल्या बॉलिवूड मध्ये असेही काही स्टार कलाकार होऊन गेलेले आहेत ज्यांच्या मृत्यूच्या मागील रहस्य हे रहस्यच राहिले. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहोत असे कोणते कलाकार आहेत ज्यांच्या मृत्यूचे रहस्य हे कोणालाही कळाले नाही. तर चला पाहूया..

प्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटींचे रहस्यमय मृत्यू  – Bollywood Actresses who Died Mysteriously

Bollywood Actresses who Died Mysteriously
Bollywood Actresses who Died Mysteriously

१) दिव्या भारती – Divya Bharti

दिव्या भारती एक हिंदी चित्रपटातील अभिनेत्री होती. तिने बरेच चांगले चित्रपट केले होते पण वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. २५ एप्रिल १९९३ च्या रात्री दिव्या भारती तिच्या घराच्या पाचव्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. ती पाचव्या मजल्यावरून खाली कशी पडली, तिने नशा केलेली होती की तिला कोणी ढकलून दिले होते हे प्रश्न बरेच लोकांना तेव्हा पडले होते.

२) परवीन बॉबी – Parveen Babi

परवीन बॉबी उत्कृष्ट बॉलिवूड कलाकारां मधील एक. ज्यांनी बॉलिवूड च्या महान हस्तीनंसोबत काम केले होते मग ते अमिताभ बच्चन असोत की ऋषी कपूर. पण २२ जानेवारी २००५ ला मुंबई ला त्यांच्या घरी त्यांचा मृत्यू झाला होता. आणि त्यांच्या निधनाची वार्ता २ दिवसांनी माहिती झाली होती. पण त्यांची मृत्यूचे रहस्य हे कोणालाही माहिती झाले नाही. एकेकाळी त्या ग्लॅमरस अदांसाठी खूप प्रसिद्ध होत्या.

३) श्रीदेवी – Sridevi

श्रीदेवी बॉलिवूड च्या महान हस्ती पैकी एक व्यक्तिमत्व आपल्या बॉलिवूड च्या करियर मध्ये त्यांनी बॉलिवूड ला कित्येक शानदार चित्रपट दिलेत. आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी कित्येक पुरस्कार सुध्दा मिळाले. पण श्रीदेवी दुबई ला त्यांच्या भाच्याच्या लग्नाला गेल्या असताना दुबई ची यात्रा त्यांच्या साठी अखेरची यात्रा ठरली. २४ फेब्रुवारी २०१८ ला त्यांचा मृतदेह दुबई च्या जुमैरा हॉटेल मध्ये बाथटप मध्ये आढळला तेथील स्टाफ चे म्हणणे होते की श्रीदेवी ४८ घंटे त्यांच्या रुम मधून बाहेर आल्या नव्हत्या. आणि त्यांच्या मृत्यू चे कारण काय होते हे लक्षात आले नाही. त्यांची मृत्यू एक रहस्यच राहून गेली. त्यांच्या सारखी अभिनेत्री बॉलिवूड ला लाभणे खूप कठीण आहे.

४) जिया खान – Jiah Khan

राम गोपाल वर्मा यांची आलेली निशब्द मूवी. आणि त्या चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश करणारी अभिनेत्री जिया खान. २०१३ मध्ये यांचा मृतदेह त्यांच्या घरातून फासाला लटकलेला पोलिसांना आढळला, पण त्यांच्या घरच्यांचे म्हणणे होते की ही आत्महत्या नसून हा कोणी तरी डाव काढला आहे. आणि अजूनही हा मृत्यू कसा झालाय हे रहस्य च राहिले आहे.

५) प्रत्युषा बनर्जी – Pratyusha Banerjee

बालिका वधू नाटकातील कलाकार प्रत्युषा बनर्जी ज्यांनी नाटकामध्ये आनंदी नावाच्या मुलीची भूमिका केली होती. त्यांनी फक्त २४ वर्षाच्या असतांना गळ्याला फास लावून आत्महत्या केली. वयाच्या २४ व्या वर्षी फाशी का घेतली असेल यामागचे कारण अजूनही कोणाला कळाले नाही आहे.

६) नफीसा जोसेफ – Nafisa Joseph

नफीसा जोसेफ १९९७ च्या मिस इंडिया यूनिवर्स चा अवार्ड आपल्या नावावर करणारी अभिनेत्री, सोबतच ताल चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री, २००४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी स्वतः गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली होती, आणि त्यांच्या या आत्महत्ये मागे त्यांचे लग्न रद्द झाल्याची बातमी घरच्यांद्वारे सांगण्यात येत होते. त्यांच्या मृत्यू मागे तेच कारण होते की आणखी काही हे रहस्यच राहून गेले.

७) सिल्क स्मिता – Silk Smitha

सिल्क स्मिता ह्या बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. १९९३ मध्ये चेन्नई मध्ये त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह आढळला होता. एकेकाळी त्या बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. व त्यांच्या मृत्यूचे रहस्य हे आजपर्यंत कोणाला माहिती झाले नाही.

तर या लेखात आपण पाहिले काही बॉलिवूड मधील असे कलाकार ज्यांची मृत्यू एक रहस्य राहिली आहे. आशा करतो लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल आपल्याला लिहिलेला लेख आवडला असेल तर या लेखाला आपण आपल्या सोशल मीडियावर शेयर करू शकता.सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले राहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top