“एड्स (HIV) विषयी घोषवाक्ये”

HIV AIDS Slogan

ज्या आजाराविषयी आजकाल समाजात बोलल्या जात नाही, तसेच समाजामध्ये ज्या आजाराविषयी कमी  जागरुकता आहे, असा आजार म्हणजे एड्स. HIV च्या विषाणूमुळे हा आजार आपल्याला होऊ शकतो, हा आजार असुरक्षित लैंगिक संबंध केल्याने, तसेच पिडीत व्यक्तीच्या रक्ताद्वारे हा आजार आपल्याला होऊ शकतो. या आजारापासून वाचण्यासाठी आपण लैंगिक संबंध ठेवताना बाजारात मिळणाऱ्या गर्भनिरोधक गोष्टींचा वापर करू शकतो, जसे बाजारात मिळणारे कंडोम, तसेच रक्ताची देवाण घेवाण करताना, रक्ताची योग्य प्रकारे चाचणी करून नंतरच रक्ताची देवाणघेवाण झाली पाहिजे.

आणि समाजामध्ये एड्स विषयी जेवढी जास्त जागरुकता पसरविल्या जाईल तेवढी जास्त जागरुकता पसरविण्याचे काम करा, कारण बऱ्याच लोकांच्या मनात ह्या आजाराला घेऊन बरेचसे गैरसमज आहेत आणि आजचा लेख आपण एड्स विषयी जागरुकता पसरविण्यासाठी बनवत आहोत,

आजच्या लेखात आपण एड्स विषयी घोषवाक्ये पाहणार आहोत, ज्या आपल्याला समाजात जागरुकता पसरविण्यासाठी मदत करतील.

तर चला मग पाहूया काही घोषवाक्ये!

HIV Slogan in Marathi

“एड्स (HIV) विषयी घोषवाक्ये”- HIV Slogan in Marathi

  1. असेल एड्स जेथे, जीवनाचा नाश तेथे.
  2. संयम पाळा, एड्स टाळा,
  3. असुरक्षीत लैंगिक संबंधात करू नका घाई, हा मानव जन्म पुन्हा नाही.
  4. कंडोमचा वापर करून, एड्सला लावा पळवून.
  5. करा प्रतिज्ञा स्वतःशी, दूर राहील असुरक्षित संबंधाशी.
  6. सुरक्षेत आहे तुमची भलाई, हीच खरी जीवनाची कमाई.
  7. सुरक्षित लैंगिक संबंध, दूर करी एड्स चे बांध.
  8. एड्स मुळे होते जीवनाचे खंडण, म्हणूनच वापरा निरोध कंडोम.
  9. कंडोम वापरून होईल सुरक्षा, हीच जीवनाची खरी परीक्षा.
  10. मैत्री करावी कंडोम शी, नसेल भीती एड्सशी
  11. चाचणी करा रक्ताची, समस्या दूर होईल एड्सची.
  12. हस्तांदोलन करा न भिता, एड्स होत नाही कोणाला स्पर्शता.
  13. नियम पाळा, एड्स टाळा.
  14. लैंगिक संबंध ठेवता दक्षता पाही, कारण एड्सवर कोणताही इलाज नाही.
  15. होऊन जरा सुशिक्षित, करा लैंगिक संबध सुरक्षित.
  16. करा त्या सर्व गोष्टी, ज्यामुळे होईल एड्सची पुष्टी.
  17. एड्स आजार नाही सोपा, म्हणून त्यापासून स्वतःला जपा.
  18. एड्स वर गरज नाही औषधाची,फक्त काळजी घ्या स्वतःची.
  19. गरज हवेची असे पक्षा, करा एड्स पासून स्वतःची सुरक्षा,
  20. कंडोम मुळे होईल सुरक्षा, बरे आहे ते एड्स पेक्षा.

काही घोषवाक्ये आपल्याला हसवून देतील पण आजच्या समाजातील ती वास्तविकता आहे, लोकांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावा पण भारतातून या आजाराला दूर करण्यासाठी मदत करा. आणि लोकांमध्ये जागरुकता पसरावा.

आशा करतो आपल्याला आजचा लेख आवडला असेल,या लेखाच्या माध्यमातून आम्ही समाजात या आजाराविषयी जागरुकता पसरविण्याचे कार्य करत आहे, आपणही आपले योगदान देऊन समाजात या आजाराविषयी जागरुकता पसरवा. जेणेकरून या समाजाचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला स्वतःवर गर्व होईल.

आपल्याला हा लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत या लेखाला शेयर करायला विसरू नका.

Thank You Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here