जाणून घ्या २६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

26 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कश्या प्रकारे २६ ऑगस्ट दिवस इतिहास घडलेल्या ऐतिहासिक घटनांकरीता महत्वाचा आहे. तसचं, या दिवशी जन्मदिन, निधन असणाऱ्या व्यक्तींबद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आपण जाणून घेऊ २६ ऑगस्ट या दिवसाचा दिनविशेष.

जाणून घ्या २६ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 26 August Today Historical Events in Marathi

26 August History Information in Marathi
26 August History Information in Marathi

२६ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 August Historical Event

  • इ.स. १३०३ साली खिलजी राजवंशीय शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी चित्तोडगढ चे शासक रतन सिंह यांच्या विरुद्ध युद्ध पुकारून चित्तोडगढ आपल्या ताब्यात घेतला.
  • सन १९२० साली अमेरिकेतील महिलांना १९६५ च्या कायद्या अंतर्गत मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • सन १९९४ साली लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
  • सन २००२ साली दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरांत दहा दिवसांच्या पृथ्वी शिखर परिषदेस प्रारंभ झाला.
  • सन २००८ साली भारतीय तेलगु चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांनी आपला नवीन पक्ष प्रजा राज्यम पक्षाची स्थापना करून आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती या ठिकाणी पहिली सभा घेतली.

२६ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स.१८९१ साली भारतीय हिंदी साहित्याचे लेखक व कादंबरीकार आचार्य चतुरसेन शास्त्री यांचा जन्मदिन.
  • सन १९१० साली शांततेचा नोबल पुरस्कार तसचं, भारतीय सर्वोच्च नागीर पुरस्कार भारतरत्न सन्मानित  अल्बेनियन-भारतीय रोमन कॅथोलिक धर्मगुरू व समाजसेविका मदर टेरेसा यांचा जन्मदिन.
  • सन १९२७ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता, ज्येष्ठ कॉंग्रेस नेता, व हरियाणा राज्याचे माजी मुख्यमंत्री बंसीलाल यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली जगातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी हिरो सायकल्सचे संस्थापक आणि अध्यक्ष व भारतीय व्यापारी ओम प्रकाश मुंजाल यांचा जन्मदिन.
  • सन १९५६ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व देशाच्या प्रथम पंतप्रधान महिला इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्या पत्नी मेनका गांधी यांचा जन्मदिन.

२६ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 August Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९३४ साली प्रसिद्ध भारतीय बंगाली संगीतकार, गीतकार आणि गायक, तसचं, महान कायदेपंडित, परोपकारी, समाजसेवक, शिक्षणतज्ञ आणि साहित्यिक अतुल प्रसाद सेन यांचे निधन.
  • सन १९४८ साली ख्यातनाम महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, लेखक, नाट्याचार्य, पत्रकार आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे सहकारी व केसरी वृत्तपत्राचे संपादक व नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे निधन.
  • सन १९७५ साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी आणि कॉंग्रेस सेवा दलाचे संस्थापक व राजकारणी डॉ. नारायण सुब्बाराव हार्दिकर यांचे निधन.
  • सन २०१२ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी,  हिंदी चित्रपट व रंगमंच अभिनेते ए. के. हंगल यांचे निधन.

मित्रांनो, वरील महीती आपणास स्पर्धात्मक परीकाक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. तरी, आपण या माहितीचे वाचन करून आपल्या मित्रांना देखील ही माहिती पाठवा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here