जी.पी.एस. म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते?

GPS Information in Marathi

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाजवळ मोबाईल फोन पाहायला मिळतो, आणि स्मार्टफोन मुळे माणसाचं जीवन खूप सोपी झालेल आहे आपण असेही म्हटले तरी चालेल, जगातील कुठलीही माहिती व्यक्तीच्या एका क्लिकवर उपलब्ध झालेली आहे, आता माणसाला बाहेर कुठेही फिरायला जायचे असल्यास त्याला कुठल्याही व्यक्तीला रस्ता विचारण्याची गरजच राहिलेली नाही, कारण आता  प्रत्येकाकडे स्मार्टफोन उपलब्ध झालेला आहे.

आणि तो त्याच स्मार्टफोनच्या माध्यमातून अश्याच अनेक गोष्टींचा फायदा घेत आहे, आणि हे सर्व शक्य झाले आहे, जीपीएस मुळे पण हे जीपीएस आहे काय आणि हे कसे कार्य करते हे बऱ्याच लोकांना माहिती नसत त्यासाठी आजच्या लेखात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत की जीपीएस काय असते आणि ते कार्य कसे करते? तर चला पाहूया..

जी.पी.एस. म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते? – What is GPS Meaning in Marathi

GPS Meaning in Marathi
GPS Meaning in Marathi

जीपीएस म्हणजे नेमकं काय असत? – What is GPS?

जीपीएस (GPS) चा फुल फॉर्म आहे, ग्लोबल पोजिशनिंग सिस्टम(GLOBAL POSITIONING SYSTEM). आणि जीपीएस प्रणाली ही संपूर्ण जगातील दिशा दर्शवणारी सॅटेलाईट प्रणाली आहे, ही जीपीएस प्रणाली पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची माहिती आणि वेळ जीपीएस रिसीवर ला देते. आणि या प्रणालीचा वापर करून आपण पृथ्वीवरील कोणत्याही रस्त्यांवर फिरू शकतो. तेही कोणतेही रस्ते आणि त्या रस्त्यांमधील अंतर.

जीपीएस चा इतिहास – GPS History in Marathi 

जीपीएस प्रणालीचा शोध अमेरिकेच्या संरक्षण दलाने १९६० मध्ये त्यांच्या सीमारक्षक दलासाठी लावला होता जेणेकरून ते शत्रूच्या ठिकाणांवर नजर ठेवू शकतील.आणि त्यांच्या ठिकाणांची माहिती काढू शकतील, परंतु या तंत्रज्ञानाला १९९५ मध्ये जगातील प्रत्येकासाठी उघडण्यात आले आणि ही प्रणाली प्रत्येकाला उपलब्ध करण्यात आली. म्हणून आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ही प्रणाली आपल्याला पाहायला मिळते.

जीपीएस काम कसे करते? – How does GPS work

जीपीएस हे ३० सॅटेलाईट चे एक नेटवर्क आहे जे आपल्या पृथ्वीच्या जमीनीपासून २०,००० किलोमीटर दूर आहे. आणि ते पृथ्वीच्या कक्षेत आजूबाजूला फिरत असते. जेव्हा आपण मोबाईल चे जीपीएस सुरू करतो तेव्हा ४ सॅटेलाईट आपली लोकेशन चेक करतात, आणि वेळोवेळी या चार सॅटेलाइट मूळे आपल्या लोकेशन ची आणि वेळेची माहिती सिग्नल द्वारा ट्रान्समिट केल्या जाते, या ट्रान्समिट केल्या गेलेल्या सिग्नल ची स्पीड ही लाईटच्या स्पीड इतकी असते. आणि आपला मोबाईल या वेळी रिसीवर चे कार्य करतो. त्यामुळे आपल्याला योग्य लोकेशन ची माहिती मिळते.

जीपीएस चा उपयोग – Uses of GPS

  •  जीपीएस प्रणाली मूळे आपल्याला आपली लोकेशन माहिती करून घेण्यासाठी फायदा होतो.
  •  जीपीएस प्रणाली मूळे योग्य वेळेची माहिती आपल्याला मिळण्यास मदत होते.
  •  जीपीएस प्रणाली मूळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत होते.
  •  एखाद्या व्यक्तीच्या लोकेशन ला ट्रॅकिंग करण्यासाठी जीपीएस प्रणालीचा वापर होतो.

वरील लेख वाचून जीपीएस विषयी माहिती मिळाली असेल, तर अशा करतो वरील लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल, आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका. सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील. Thank You And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here