Monday, June 16, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जगातील सर्वात भयानक महाराणी, मुलींच्या रक्ताने करायची अंघोळ

सिरीयल किलर हा शब्द निघाला तर आपल्या डोळ्यासमोर एखाद्या भयानक अपराध्याची प्रतिमा येऊन उभी राहते, ज्याने अनेक जणांना मृत्यू च्या दरवाज्यावर पोहचविलेले असते. सिरीयल किलर त्यालाच म्हटल्या जात ज्याने तीन किंवा तीनपेक्षा अधिक लोकांचा जीव घेतलेला असतो,

इतिहासात असे बरेचशे सिरीयल किलर होऊन गेलेले आहेत, ज्यांनी अनेक लोकांना जीवाने मारले आहे, आपल्यालाही बरेचशे असे नावे माहिती असतीलच,

जगातील सर्वात भयानक महाराणी, मुलींच्या रक्ताने करायची अंघोळ – Horrible Female Serial Killer Elizabeth Bathory

Elizabeth Bathory
Elizabeth Bathory

पण आपण आजच्या लेखात अश्या एका सिरीयल किलर विषयी माहिती पाहणार आहोत ज्या व्यक्तीने फक्त तीन चार व्यक्तींना जीवाने मारले नाही तर ३५० पेक्षा अधिक जीवांना मृत्यू दिला आहे, तेही एका अंधश्रद्धेमुळे तर चला आजच्या लेखात आपण हा सिरीयल किलर कोण होता याविषयी माहिती पाहणार आहोत,

तर चला जाणून घेऊया..

कोण होती हि व्यक्ती? – Elizabeth Bathory

हंगेरी राज्याची एका श्रीमंत घराण्यातील हि एक महाराणी होती, जिचे नाव एलिझाबेथ बाथरी होते, एलिझाबेथ ला इतिहासातील सिरीयल किलर म्हणून ओळखले जाते, एलिझाबेथ चे लग्न फेरेन्क नडास्डी सोबत झाले होते,

तुर्कांशी झालेल्या युद्धांमध्ये फेरेन्क नडास्डी हा एक लीडर म्हणून पुढे आलेला होता आणि त्याने त्यांच्याविरोधात हंगेरी ला विजय मिळवून दिला होता. यामुळे एलिझाबेथ चा विवाह हा फेरेन्क नडास्डी याच्याशी लाऊन दिला होता.

विवाहानंतर एलिझाबेथ बाथरी ला कोणी तरी नेहमी सुंदर राहण्यासाठी एक कल्पना सुचविली, कि अंघोळ करायचीच आहे ना तर ती रक्ताने का नाही, म्हणजेच रक्ताने अंघोळ केल्यास स्वतःचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल,

अशी कोणाची सल्ला तिने मानली आणि तेव्हा पासून ती राज्यातील तरुण मुलींना महालात बोलावून घ्यायची आणि एलिझाबेथ बाथरी अशी राणी होती कि सर्वांवर तिचा चांगला प्रभाव पडलेला होता, म्हणून तिला कोणी नाही सुद्धा म्हणत नसे,

पण जेव्हा ती तरुण मुलींना आपल्या महालात बोलवून घ्यायची तेव्हा एक ठरलेले असायचे कि जी तरुण मुलगी महालात आली ती परत जाता कामा नये. त्यानंतर एलिझाबेथ बाथरी हि तरुण मुलींना मारून त्यांच्या शरीरातील रक्त एका बाथटप मध्ये घ्यायची, एवढंच नाही तर काही मुलींच्या शरीराच्या काही भागांना ती स्वतःच्या दातांनी तोडायची,

बाथटप मध्ये जमा केलेल्या रक्तात ती तासोंतास अंघोळ करायची, या अंघोळीला आणि रक्त जमा करण्याला तिला तिचे तीन नोकर मदत करीत असत. याप्रकारे एलिझाबेथ बाथरी ने ३५० पेक्षा जास्त मुलींना मारून त्यांच्या रक्ताने अंघोळ केली.

लोकांना कसे माहिती झाले?

त्या भागातील मुलींची संख्या अचानक कमी होताना तिथच्या लोकांना दिसायला लागली, सर्व लोक हा विचार करायला लागले होते कि सगळ्या मुली गेल्या कुठ असणार. त्याच वेळेला महालातून काही मुली बाहेर पडण्यात यशस्वी झाल्या.

बाहेर पडलेल्या मुलींनी जेव्हा गावात येऊन या सर्व गोष्टी गावकऱ्यांना सांगितल्या तेव्हा सुरुवातीला गावकऱ्यांना विश्वास बसेना, पण काही लोकांनी या गोष्टीला मानले आणि सरळ हंगेरी च्या राजाला या गोष्टीविषयी माहिती सांगून एलिझाबेथ बाथरी च्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

राजाने लोकांची मागणी ऐकून चौकशीचे आदेश दिले, आणि चौकशी दरम्यान हि घडलेली घटना सत्य असल्याचे समोर आले तेव्हा राजाने या गोष्टीवर कारवाई करून एलिझाबेथ बाथरी आणि तिच्या तीन नोकरांविरोधात कडक निर्णय घेतला.

त्या तीन नोकरांना ताबडतोब फाशीची शिक्षा सुनावली गेली, पण एलिझाबेथ बाथरी राजघराण्यातील असल्याने तिला फाशी तर झाली नाही, पण तिला एका अंधार असलेल्या खोलीत बंद करून ठेवल्या गेले. आणि ४ वर्षानंतर त्या महालातच तिचा जीव गेला, त्यादिवशीची तारीख २१ ऑगस्ट १६१४ होती.

अनेक निरपराध मुलींचा बळी घेतलेल्या या महाराणी चा अंत अश्या प्रकारे झाला. या महाराणी वर बरेचशे चित्रपट निघाले आहेत पण कोणीही तिने केलेल्या या घातक कृत्याला पूर्णपणे दाखवू शकले नाही. इतिहास या राणीला एक सिरीयल किलर म्हणूनच ओळखणार.

अशी होती एक सिरीयल किलर राणीचे जीवन, आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल आपल्याला लिहिलेला हा लेख आवडल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच आपल्याला लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला ते आम्हाला सोशल मिडीयावर सांगू शकता.

अश्याच आणखी लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Unique Villages
Viral Topics

जगातील पाच आगळे वेगळे गावं, पहा काय वेगळ आहे या गावात

आपण जगातील आगळ्या वेगळ्या गोष्टींची यादी याआधीही पाहिली आहेच, जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच वेगळ्या आहेत, आणि या...

by Vaibhav Bharambe
October 19, 2020
Lake Natron Mystery
Viral Topics

…याला हाथ लावला तर मिनिटात बनू शकते आपले शरीर दगडाचे, अजबच आहे ना.

लहानपणी पुस्तकात एक गोष्ट वाचली असेल ज्यामध्ये एका राजाची गोष्ट होती कि तो राजा ज्या गोष्टीला हाथ लावायचा ती गोष्ट...

by Vaibhav Bharambe
October 18, 2020
Story of Mahishasura
Information

दुर्गा मातेने महिषासुराला का मारले? हे होते त्यामागील कारण

Story of Mahishasura पुराणातील कथांच्या नुसार आपल्याला माहिती आहे, महिषासुर एक क्रूर राक्षस होता, त्याच्या अत्याचाराच्या आणि बऱ्याच कथा आपण...

by Vaibhav Bharambe
October 17, 2020
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved