टेबल टेनिस खेळाविषयी विषयी माहिती

Table Tennis Information in Marathi

संपूर्ण जगात बरेचशे प्रसिद्ध खेळ खेळले जातात, फुटबॉल पासून तर क्रिकेट पर्यंत. खेळ खेळल्यामुळे आपले आरोग्य नेहमी तंदुरस्त राहते, कारण खेळ खेळताना आपल्या शरीराची योग्य हालचाल होते, आणि ते आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते,

ज्या खेळला दोन किंवा चार व्यक्ती एकत्र खेळू शकतात, प्रत्येकाला परिचयाचा खेळ म्हणजे टेबल टेनिस. तर आजच्या लेखात आपण टेबल टेनिस विषयी माहिती पाहणार आहोत, तर चला पाहूया.

टेबल टेनिस खेळाविषयी विषयी माहिती – Table Tennis Information in Marathi

Table Tennis Information in Marathi
Table Tennis Information in Marathi

टेबल टेनिस चा इतिहास – Table Tennis History

टेबल टेनिस ची सुरुवात झाली १९ व्या शतकात इंग्लंड मध्ये झाली होती, या खेळला सुरुवातीला आपल्या हाताने बॉल ला कवर करावे लागत होते, तेव्हा बॉल ला कवर करण्यासाठी कोणतीही रॅकेट नव्हते,

या खेळाला काही दिवसानंतर बरीच विशेषता मिळायला लागली तेव्हा एका खेळणे बनविणाऱ्या कंपनी ला कल्पना सुचली कि हा खेळ खेळण्यासाठी हाताचा उपयोग करण्यापेक्षा रॅकेट चे निर्माण केले तर या खेळला आणखी चांगले खेळता येईल,

तेव्हा त्यांनी सुरुवातीला रॅकेट चे निर्माण केले आणि या खेळत ते रॅकेट वापरले जाऊ लागले, सुरुवातीला जेव्हा या रॅकेट चा उपयोग खेळण्यासाठी करण्यात आला तेव्हा त्या रॅकेट चा “पिंग पोंग” असा आवाज यायचा, म्हणून या खेळला पिंग पोंग असेही म्हटले जायचे. सोबतच व्हिफ़ वॉफ़, फ़्लिम फ़्लैम या नावांनी ओळखले जाते.

या खेळासाठी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन ची स्थापना १९२६ ला झाली होती, त्यानंतर या खेळाला एवढी लोकप्रियता मिळाली कि १९८८ च्या ऑलंपिक मध्ये या खेळाला खेळले जाऊ लागले,

कसा खेळला जातो टेबल टेनिस – How to Play Table Tennis

या खेळाला खेळण्यासाठी आपल्याला दोन किंवा चार व्यक्तींची आवश्यकता असते, सोबतच या खेळाला एक टेनिस टेबल, रॅकेट, आणि प्लास्टिक चा छोटा हलका बॉल चा वापर करून खेळल्या जातं.

टेबल टेनिस ज्या टेबल वर खेळल्या जातं, त्याची लांबी २.७४ मीटर आणि रुंदी १.५२५ मीटर एवढी असते, या टेबल ला जमिनीपासून ७६ सेमी वरती ठेवल्या जाते, आणि या टेबल ला नेट च्या माध्यमाने दोन भागांमध्ये विभागल्या जाते. त्यांनतर ज्या रॅकेट ने टेबल टेनिस खेळल्या जात ते रॅकेट लाकडाच्या फ्रेम चे बनलेले असते आणि त्यावर रबरचे कवर लावलेले असतात. त्यानंतर प्लास्टिक बॉल चे वजन २.७ ग्रॅम एवढे असते,

ज्याप्रमाणे टेनिस खेळ खेळल्या जातो त्याच प्रमाणे टेबल टेनिस सुद्धा खेळल्या जातो, परंतु टेनिस आणि टेबल टेनिस मध्ये स्कोरिंगची व्यवस्था हि वेगवेगळी असते,

टेनिस मध्ये ज्या प्रमाणे एक खेळाडू पूर्ण टेनिस खेळला चालू ठेवतो पण टेबल टेनिस मध्ये प्रत्येक दोन अंकानंतर सर्विस बदलवली जाते, आणि जेव्हा स्कोर १०-१० पर्यंत जातो त्यानंतर तर सर्विस ला बदलवलीच जाते.

टेबल टेनिस ला बेस्ट ऑफ फाईव मध्ये खेळल्या जात. आणि त्यापैकी जिंकण्यासाठी कोणत्याही टीम ला तीन सामने जिंकणे आवश्यक आहे तीन सामने जिंकल्यानंतर त्या टीम ला विजेता घोषित केले जाते.

तर आजच्या लेखात आपण टेबल टेनिस या खेळाविषयी माहिती पाहिली आशा करतो आपल्याला लिहिलेला हा लेख आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.
आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here