जाणून घ्या 16 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष

16 December Dinvishes

१६ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 December Today Historical Events in Marathi

16 December History Information in Marathi
16 December History Information in Marathi

१६ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –  16 December Historical Event

  • १७०७ ला जपान च्या माउंट फुजी या पर्वतावर या दिवशी शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.
  • १९४५ ला जपान चे दोन वेळा राहिलेले प्रधानमंत्री फ्युमिमारो कोनी यांनी आत्महत्या केली होती.
  • १९५१ ला हैदराबाद चे सालार जंग संग्रहालयाची स्थापना.
  • १९७१ ला बांग्लादेश पाकिस्तान पासून वेगळा होऊन स्वतंत्र देश बनला.
  • १९८५ ला तामिळनाडू च्या कल्पक्कम ला फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर ची स्थापना.
  • १९९३ ला दिल्लीला सर्वांसाठी शिक्षण हे चर्चासत्र पार पडले.
  • २००७ ला बांग्लादेश ने पाकिस्तान पासून मुक्तीचा ३६ वा विजय दिवस साजरा केला होता.
  • २०१४ ला पाकिस्तान च्या पेशावर येथे दहशदवादी हल्ल्यात १५० लोकांचा जीव गेला होता त्यामध्ये १३४ लहान मुले होती

१६  डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 December Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १९३७ ला भारतीय कुश्तीपटू हवा सिंग यांचा जन्म.
  • १९५९ ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा जन्म.
  • १९७० ला महाराष्ट्राचे लोकसभेचे सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांचा जन्म.
  • १९८६ ला भारतीय गायिका हर्षदीप कौर यांचा जन्म.
  • १९९३ ला जगातील सगळ्यात लहान उंचीची महिला ज्योती आमगे यांचा जन्म.

१६ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 December Death / Punyatithi / Smrutidin

  • १९७१ ला परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित भारतीय सैनिक सेकंड लेफ्टनंट अरुण खेतारपाल शहीद झाले होते.
  • १९७७ ला ध्यानचंद यांचे भाऊ आणि हॉकी चे प्रसिद्ध खेळाडू रूपसिंग यांचे निधन.
  • २००२ ला भारतीय अभिनेत्री कव्वाल शकीला बानो यांचे निधन.
  • २००४ ला भारतीय अभिनेता प्रतापचंद्र यांचे निधन.
  • २०१३ ला भारतीय क्रिकेटर मधुसूदन रेगे यांचे निधन.
  • २००४ ला मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन.

१६ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

  • भारतीय विजय दिवस

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here