जाणून घ्या 19 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

19 February Dinvishesh

१९ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.

१९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 February Today Historical Events in Marathi

19 February History Information in Marathi
19 February History Information in Marathi

१९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 February Historical Event

  • १६३० ला माता जिजाऊ ने शिवनेरी किल्ल्यावर शिवबांना जन्म दिला.
  • १८७८ ला आजच्या दिवशी थॉमस एडिसन यांनी फोनोग्राप चे पेटंट स्वतःच्या नावावर नोंदविले.
  • १९८६ ला आज पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण तिकिटांची सुरुवात झाली.
  • २००३ ला तंबाखूच्या उत्पादनांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्थाव केंद्रीय मंत्रिमंडळात पारित करण्यात आला.
  • २०१४ ला आजच्या दिवशी फेसबुक ने व्हॉट्सअ‍ॅप ला १९ बिलियन डॉलर ला विकत घेण्याचे घोषित केले, आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअ‍ॅप ला विकत सुद्धा घेतले.

१९ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 February Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • १४७३ ला आजच्या दिवशी महान निकोलस कोपर्निकस यांचा जन्म.
  • १६३० ला जनतेचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म.
  • १८९८ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोकुलभाई भट्ट यांचा जन्म.
  • १९०० ला आजच्या दिवशी गुजरात चे माजी मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.
  • १९०६ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे संघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांचा जन्म.
  • १९१९ ला प्रसिद्ध मराठी लेखक अरविंद गोखले यांचा जन्म.
  • १९२२ ला पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियंत सिंग यांचा जन्म.
  • १९२५ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध कलाकार राम वी. सुतार यांचा जन्म.
  • १९३० ला दक्षिणात्य चित्रपटाचे दिग्दर्शक काशिनाथ विश्वनाथ यांचा जन्म.
  • १९४३ ला भारतीय अभिनेत्री बीना बॅनर्जी यांचा जन्म.
  • १९७७ ला प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांचा जन्म.

१९ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 February Death / Punyatithi / Smrutidin

  • १८१८ ला मराठा शाहीचे शेवटचे सेनापती नरहर गणेश गोखले उर्फ बापू गोखले यांचे निधन.
  • १८९५ ला देशाचे प्रसिद्ध प्रकाशक मुंशी नवल किशोर यांचे निधन.
  • १९१५ ला आजच्या दिवशी भारतीय स्वातंत्र्य सैनिक गोपाळकृष्ण गोखले यांचे निधन
  • १९५६ ला आजच्या दिवशी प्रसिद्ध समाजसेवक तसेच विद्वान नरेंद्र देव यांचे निधन.
  • १९७८ ला प्रसिद्ध संगीतकार पंकज मलिक यांचे निधन.
  • २००२ ला प्रसिद्ध मराठी अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.
  • २०१७ ला भारताचे माजी सर न्यायाधीश अल्तमस कबीर यांचे निधन.

१९ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.

आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here