Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या २८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष

28 August Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या भूतपूर्व घटनांची संपूर्ण माहिती देणार आहोत.तसचं,  काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या २८ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 28 August Today Historical Events in Marathi

28 August History Information in Marathi
28 August History Information in Marathi

२८ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 August Historical Event

  • इ.स. १८४५ साली अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक ‘सायंटिफिक अमेरिकन’ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.
  • सन १९०४ साली कलकत्ता ते बैरकपुर शहरादरम्यान पहिल्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होत.
  • सन १९३७ साली जपानची जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह निर्मिती कंपनी ‘टोयोटा मोटर्स’ ची स्थापना करण्यात आली.
  • सन १९८६ साली भाग्यश्री साठे बुद्धिबळ ग्रँडमॅस्टर बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
  • सन १९९२ साली श्रीलंकन क्रिकेटपटू व फिरकी गोलंदाज मुथया मुरलीधरन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.

२८ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 August Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८९६ साली ज्ञानपीठ पुरस्कार व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कवी व लेखक फिराक गोरखपुरी यांचा जन्मदिन.
  • सन १९०६ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चिंतामणी गोविंद पेंडसे यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली भोपाल रियासतेच्या राजकुमारी व भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुल्तान यांचा जन्मदिन.
  • सन १९२६ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी पोलिस सेवा अधिकारी, गुप्तचर विभाग प्रमुख तसचं, सिक्किम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली भारतीय शास्त्रीय सितार वादक उस्ताद विलायत ख़ाँ यांचा जन्मदिन.
  • सन १९२८ साली पद्मभूषण व  पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ‘भारतीय अंतरिक्ष संघटना’ (इस्त्रो) चे भूतपूर्व अध्यक्ष व भारतीय भौतिकशास्त्रज्ञ एम. जी. मेनन यांचा जन्मदिन.
  • सन १९२९ साली प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कथाकार, उपन्यासकार आणि आलोचक राजेंद्र यादव यांचा जन्मदिन.

२८ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 August Death / Punyatithi /Smrutidin

  • इ.स. १६६७ साली  मुघल साम्राज्याचे ज्येष्ठ सेनापती आणि आमेर राज्याचे राज्यकर्ता महाराजा मिर्झा राजे जयसिंग यांचे निधन.
  • सन १९७२ साली भारतीय नागरी सेवक आणि प्रशासक तसचं, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य एन. माधवराव यांचे निधन.
  • सन १९८० साली लोकप्रिय बंगाली लेखक, विनोदी व लघुकथाकार व क्रांतिकारक शिब्राम चक्रवर्ती यांचे निधन.
  • सन १९९० साली भारतीय चित्रपट अभिनेत्री सुमित्रा देवी यांचे निधन.
  • सन २००१ साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, चित्रकार, पटकथाकार, शिकारी व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचे निधन.

मित्रांनो, हा लेख आपणास २८ ऑगस्ट या दिवशी इतिहासात तसेच आधुनिक काळात काय काय घडलं होत याबद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध करून  देतो. तरी आपण या लेखाचे अवश्य वाचन करून आपल्या मित्रांना सुद्धा पाठवा. धन्यवाद..

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved