Tuesday, May 6, 2025
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ४ जून रोजी येणारे दिनविशेष

4 June Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास कालीन ऐतिहासिक घटना, तसचं काही विशिष्ट व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ४ जून रोजी येणारे दिनविशेष – 4 June Today Historical Events in Marathi

4 June History Information in Marathi
4 June History Information in Marathi

४ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 June Historical Event

  • इ.स.१८९६ साली अमेरिकन उद्योगपती व फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेनरी फोर्ड यांनी अमेरिकेतील डेट्रॉइट शहरात आपल्या पहिल्या फोर्ड मोटारीची यशस्वी चाचणी घेतली.
  • सन १९२९ साली अमेरिकन उद्योगपती व ईस्टमेन कोडक कंपनीची संस्थापक जॉर्ज ईस्टमैन यांनी पहिल्या रंगीत चित्रपटाचा नमुना सादर केला.
  • सन १९४० साली द्वितीय महायुद्धादरम्यान जर्मन सैन्यांनी फ्रांस देशाची राजधानी पॅरिसमध्ये प्रवेश केला.
  • सन १९४४ साली द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळी अमेरिकेच्या सैन्यांनी रोम देशांत प्रवेश केला.
  • सन १९५९ साली भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय नागरिक सी राजगोपालचारी यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
  • सन १९९३ साली भारतीय युद्ध नौका आय.एन. एस म्हैसूर चे जलावतरण करण्यात आले.
  • सन १९९४ साली सुप्रसिद्ध भारतीय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब पुरस्कार जाहीत करण्यात आला.
  • सन १९९७ साली इनसॅट -2 डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे प्रक्षेपण फ्रेंच गयानातील कौऊरु येथून यशस्वीपणे करण्यात आले.
  • सन २००८ साली हरियाणा राज्य सरकारकडून २५ वर्षांखालील मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ जाहीर करण्यात आला.

४ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • सन १९०४ साली भारतीय लेखक, प्रकाशक आणि पर्यावरणवादी भगत पूरन सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९३१ साली भारतीय रंगहीन हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्या बिना राय यांचा जन्मदिन.
  • सन १९३६ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नूतन यांचा जन्मदिन.
  • सन १९४६ साली पद्मश्री पुरस्कार, तसचं, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक,  संगीत दिग्दर्शक, अभिनेता आणि चित्रपट निर्माता एस. पी.  बालसुब्रह्मण्यम यांचा जन्मदिन.
  • सन १९४७ साली लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ याचा जन्मदिन.
  • सन १९५९ साली प्रसिद्ध भारतीय उद्योगपती व रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिन.
  • सन १९७५ साली प्रख्यात अमेरिकन चित्रपट अभिनेत्री एंजेलिना जोली यांचा जन्मदिन.

४ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९१८ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी भाषिक कवी व भाषांतरकार रावसाहेब गोविंद वासुदेव कानिटकर यांचे निधन.
  • सन १९८९ साली अमेरिकन व्यंगचित्रकार डिक ब्राउन यांचे निधन.
  • सन २०१४ साली अमेरिकन बेसबॉल खेळाडू, व्यवस्थापक आणि मेजर लीग बेसबॉल (एमएलबी) चे प्रशिक्षक डॉन झिम्मर यांचे निधन.
  • सन २०१५ सकू सुप्रसिद्ध अमेरिकन विन्स्टन चषक मालिका कार रेस ड्रायव्हर जबे थॉमस यांचे निधन.
Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास
Forts

सुवर्णदुर्ग किल्ला माहिती व इतिहास

Suvrnadurga Killa 'ज्याचं आरमार त्याचा समुद्र' हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना चांगल्या प्रकारे माहीत होतं. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय...

by Editorial team
July 10, 2022
Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • करिअर
  • Self Help
    • Books
    • Marathi Quotes
    • Success Story
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • व्हिडिओ

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved