Friday, June 2, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या १० जुलै रोजी येणारे दिनविशेष

10 July Dinvishes

मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य या संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या १० जुलै रोजी येणारे दिनविशेष – 10 July Today Historical Events in Marathi

10 July History Information in Marathi
10 July History Information in Marathi

१० जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 July Historical Event

  • इ.स. १८०० साली ब्रिटीश कालीन भारतात भारताचे तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्ली( Lord Wellesley) यांनी कलकत्ता शहरात फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना केली.
  • सन १९७८ साली मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.
  • सन १९८३ साली ब्रिटन मध्ये मार्गरेट थेचर(Margaret Thatcher) यांची पंतप्रधान पदी पुन्हा नियुक्ती झाली.
  • सन १९९२ साली संपूर्ण भारतीय बनावटी चा दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामान सेवांचा बहुउद्देशीय उपग्रह इनसॅट -२ चे प्रक्षेपण फ्रेंच गयानाच्या कुरुझ येथून एरियन -4 द्वारे यशस्वीरित्या करण्यात आले.
  • सन १९९९ साली जिनिव्हा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय श्रम संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
  • सन २००३ साली अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेने मंगळावर पाठवलेले मंगळ यान रोवर मंगळ ग्रहावर यशस्वी उतरले.
  • सन २००५ साली भारत आणि श्रीलंका देशादरम्यान शिक्षण आणि समुदाय विकासाशी संबंधित दोन करारांवर हस्ताक्षर करण्यात आले.

१० जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 July Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८५६ साली वाय फाय प्रणालीचे जनक व अमेरिकन सर्बियन-अमेरिकन शोधक, इलेक्ट्रिकल अभियंता, मेकॅनिकल अभियंता निकोला टेस्ला(Nikola Tesla) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८८ साली प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक व शिक्षणमंत्री महात्मा हंसराज यांचे पुत्र बलराज भल्ला यांचा जन्मदिन.
  • सन १९१३ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी व स्त्रीवादी लेखिका पद्मा गोळे यांचा जन्मदिन.
  • सन १९२३ साली साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा लेखक जी. ए. कुलकर्णी यांचा जन्मदिन.
  • सन १९४० साली प्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ व इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’ चे माजी सभासद लॉर्ड मेघनाद देसाई यांचा जन्मदिन.
  • सन १९४३ साली अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन ऐकरी टेनिस स्पर्धा जिंकणारे पहिले अमेरिकन कृष्णवर्णीय व्यावसायिक टेनिसपटू आर्थर रॉबर्ट ऐश(Arthur Ashe) यांचा जन्मदिन.
  • सन १९४९ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व समालोचक सुनील मनोहर गावसकर यांचा जन्मदिन.
  • सन १९५० साली भारत सरकारतर्फे पद्मश्री, पद्मभूषण, आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित पंजाबमधील पटियाला घराण्यातील प्रसिद्ध भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका बेगम परवीन सुल्ताना यांचा जन्मदिन.
  • सन १९५१ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री राजनाथ सिंह यांचा जन्मदिन.
  • सन १९८१ साली राजीव गांधी खेल रत्न,  अर्जुन पुरस्कार, व पद्मश्री पुरस्कार सास्न्मानीत पॅराअ‍ॅथलेटिक्स पटू देवेंद्र झाझड़िया यांचा जन्मदिन.

१० जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 July Death / Punyatithi /Smrutidin

  • सन १९६९ साली महाराष्ट्रीयन मराठी इतिहास संशोधक व मराठी-कोकणी लेखक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन.
  • सन १९७१ साली ‘भोजपुरी शेक्सपिअर’ म्हणून प्रसिद्ध असलेले भोजपुरी बोलीभाषातील भारतीय नाटककार, गीतकार, अभिनेता, लोकनृत्यकार, लोक गायक आणि सामाजिक कार्यकर्ते भिकारी ठाकूर यांचे निधन.
  • सन १९८९ साली साम्यवादी विचारांचे महाराष्ट्रीयन मराठी लेखक व पत्रकार तसचं, ‘नवे जग’ या साम्यवादी वाहिलेल्या मराठी नियतकालिकेचे माजी मुख्य संपादक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचे निधन.
  • सन १९९५ साली गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अभिनव भारत संघटनेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण विष्णू केळकर उर्फ दादासाहेब केळकर यांचे निधन.
  • सन २००५ साली महाराष्ट्रीयन मराठी पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचे निधन.
  • सन २०१४ साली भारतीय चित्रपट अभिनेत्री, नर्तक आणि नृत्यदिग्दर्शक जोहरा सहगल यांचे निधन.
Previous Post

संत गजानन महाराज यांची बावन्नी

Next Post

पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Waterless Car Wash Success Story

पाण्याच्या थेंबाचा वापर न करता आपली गाडी स्वच्छ करू शकतो हा स्टार्टअप

Indian Train Window

रेल्वेच्या काही खिडक्या असतात या कारणांमुळे वेगळ्या, जाणून घ्या या लेखातून.

11 July History Information in Marathi

जाणून घ्या ११ जुलै रोजी येणारे दिनविशेष

Rochak Tathya

अश्या ५ गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहिती नाहीत

Marathi Story about Karma

कर्माचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही,अशीच एक छोटीशी स्टोरी जी आपल्याला शिकवण देऊन जाईल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved