• Latest
  • Trending
  • All
  • News
  • Business
  • Politics
  • Science
  • World
  • Lifestyle
  • Tech
Rajguru Information in Marathi

शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 18, 2021
Lagori Information Marathi 

लगोरी खेळाबद्दल संपूर्ण माहिती

February 26, 2021
26 February History Information in Marathi

जाणून घ्या 26 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 26, 2021
लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

लॉकडाऊन विषयावरील मराठी निबंध

February 25, 2021
25 February History Information in Marathi

जाणून घ्या 25 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 25, 2021
Vijaya Lakshmi pandit in Marathi

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

February 24, 2021
24 February History Information in Marathi

जाणून घ्या 24 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 24, 2021
Marie Curie Information in Marathi

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 23, 2021
23 February History Information in Marathi

जाणून घ्या 23 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 23, 2021
Chetan Bhagat Books in Marathi

चेतन भगत यांची पुस्तके

February 22, 2021
22 February History Information in Marathi

जाणून घ्या 22 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 22, 2021
Aruna Asaf Ali Information in Marathi

अरुणा आसफ अली यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

February 21, 2021
21 February History Information in Marathi

जाणून घ्या 21 फेब्रुवारी रोजी येणारे दिनविशेष

February 21, 2021
  • About Us
  • Privacy Policy
  • Disclosure
  • Contact Us
Friday, February 26, 2021
MajhiMarathi
  • Home
  • सुविचार
  • सेल्फ HELP
  • VIRAL मराठी
  • रोचक इतिहास
  • महाराष्ट्रातील शहरे
  • जीवन परिचय
  • रुचकर पाककृती
No Result
View All Result
MajhiMarathi
No Result
View All Result

शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Rajguru Information in Marathi

क्रांतिकारक म्हटलं कि सुरुवातीच्या काही नावात येणार नाव म्हणजे शहीद राजगुरू. २३ मार्च १९३१ रोजी देशासाठी फासावर जाणाऱ्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव आणि शहीद राजगुरू यांच्या आठवणीत संपूर्ण देश २३ मार्चला ‘शहीद दिवस’ म्हणून ओळखतो.

शहीद राजगुरू यांच्या बद्दल संपूर्ण माहिती – Rajguru Information in Marathi

Rajguru Information in Marathi
Rajguru Information in Marathi

शहीद राजगुरू यांच्याबद्दल थोडक्यात – Shivaram Rajguru History in Marathi

नाव (Name) शिवराम हरी राजगुरू (Shivram Hari Rajguru)
जन्म (Birthday) २४ ऑगस्ट १९०८ (Rajguru Birthday)
जन्म स्थान (Birth Place) खेड, जिल्हा पुणे, महाराष्ट्र (Khed, Dist. Pune, Maharashtra)
वडील (Father) हरिनारायण राजगुरू (Harinarayan Rajguru)
आई (Mother) पार्वती देवी (Parvati Devi)
मृत्यु (Death) २३ मार्च १९३१ (23rd March 1931)

शहीद राजगुरू यांचा जन्म २४ ऑगस्ट १९०८ साली महाराष्ट्रातील खेड, जिल्हा पुणे येथे झाला. त्यांचे पूर्णनाव शिवराम हरी राजगुरू असे होते. लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावित असलेले राजगुरू संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. येथेच चंद्रशेखर आझाद यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला.

शहीद राजगुरू यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान : Contribution of Martyr Rajguru in the Independence Movement

हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये सामील झाल्यानंतर त्यांचा संपर्क यतीन्द्रनाथ दास, सुखदेव, भगतसिंग तसेच चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाला. या संघटनेचा मुख्य हेतू होता देशाला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करणे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते. वेगवेगळी आंदोलने, उपोषणे आणि चळवळींचा तो काळ.

अशातच पंजाब येथे एका आंदोलना दरम्यान लाला लजपत राय यांचा ब्रिटीशांच्या लाठी हल्ल्यामध्ये मृत्यु झाला. या प्रसंगामुळे शांततापूर्वक मार्गाने स्वातंत्र्य मिळवणे शक्य नाही असे देशवासीयांना वाटू लागले. यातूनच जन्म घेतला सशस्त्र क्रांतिकारी संघटनेने. या संघटनचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून शहीद राजगुरू यांना ओळखले जाते.

लाला लजपत राय यांच्यावर हल्ला करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी सौन्डर्स ची हत्त्या, करण्याचा कट रचला गेला. या कटात राजगुरुदेखील सहभागी होते. सेन्ट्रल असेम्ब्ली मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला गेला. या घटनेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. सामान्य जनतेत क्रांतिकारी विचार जागृत करणे हे या मागचे मुख्य कारण होते. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तांना इंग्रजांनी पकडणे सुरु केले होते. एक एक करून सर्वजण पकडल्या जात होते.

परंतु इंग्रज अधिकाऱ्यांना वारंवार चकमा देत राजगुरू निसटत होते. परंतु दुर्भाग्याने, पुण्यात असताना ते पकडले गेले व लाहोर कटामध्ये सामील असल्याने २३ मार्च १९३१ रोजी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. राजगुरुंसोबत भगतसिंग आणि सुखदेव या भारतमातेच्या सुपुत्रांनादेखील फासावर लटकविण्यात आले होते.

शहीद दिवस (२३ मार्च) : Shaheed Diwas

संपूर्ण देशात २३ मार्च हा दिवस, शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण भारतमातेच्या या वीर पुत्रांना श्रद्धांजली अर्पण करतो. आज आपण जे स्वातंत्र्य अनुभवत आहोत, ते फक्त आणि फक्त यांच्या बलिदानामुळे हे विसरून चालणार नाही.

शहीद राजगुरू जयंती (२४ ऑगस्ट) : Rajguru Jayanti

२४ ऑगस्ट १९०८ रोजी जन्मलेले राजगुरू वयाच्या अवघ्या २२-२३ व्या वर्षी त्यांनी देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावली. अशा या देशभक्ताला नमन करण्याचा दिन म्हणजे २४ ऑगस्ट. या दिवशी आपण शहीद राजगुरू यांना नमन करतो. त्यांच्या जीवनातून देशभक्तीचा मौल्यवान गुण आपण सर्वांनी घेतला पाहिजे.

शहीद राजगुरू यांच्या जीवनचरित्रावर काही सुविचार : Quotes on Martyr Rajguru

  1. “करतो संहार इंग्रजांचा ठायी ठायी झुकते माझे हे मस्तक तुज पायी”
  2. “नमन माझे त्या देशभक्तांना आलिंगन दिले ज्यांनी मृत्यूला, स्वातंत्र्य मिळवून दिले देशाला कोटी-कोटी वंदन माझे त्या विरपुत्रांना”
  3. “जे देशा साठी लढले, ते अमर हुतात्मे झाले ”

काही महत्वाचे प्रश्न : (FAQs)

१. शहीद राजगुरू यांचे पूर्ण नाव काय होते ?

उत्तर : शिवराम हरी राजगुरू.

२. शहीद राजगुरू यांच्यावर कोणाच्या विचार सरणीचा प्रभाव होता?

उत्तर : क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद.

३. शहीद राजगुरू यांचा जन्म कोठे झाला होता ?

उत्तर : राजगुरू यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला होता.

४. शहीद राजगुरू यांच्यासोबत आणखी कोण शहीद झाले होते?

उत्तर : शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव.

५. शहीद राजगुरू हे कोणत्या क्रांतिकारी संघटनेशी जूळलेले होते?

उत्तर : हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. (पूर्वीचे नाव : हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी)

६. शहीद दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर : २३ मार्च रोजी. (३० जानेवारी हा दिवस देखील शहीद दिवस म्हणून साजरा केल्या जातो कारण या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मृत्यु झाला होता.)

Editorial team

Editorial team

Related Posts

Vijaya Lakshmi pandit in Marathi
Marathi Biography

विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल माहिती आणि त्यांचे विचार

Vijaya Lakshmi Pandit Information in Marathi Vijaya Lakshmi Pandit in Marathi विजया लक्ष्मी पंडित यांच्या बद्दल...

by Editorial team
February 24, 2021
Marie Curie Information in Marathi
Marathi Biography

मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

Marie Curie Information in Marathi Marie Curie Information in Marathi मेरी क्युरी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती...

by Editorial team
February 23, 2021
Facebook Twitter Pinterest RSS

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • History
  • Marathi Biography
  • Information
  • Recipes

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved