Friday, June 9, 2023
Majhi Marathi
  • करिअर
  • Self Help
    • Marathi Quotes
    • Success Story
    • Books
  • Money
  • रोचक इतिहास
    • Today इतिहास
    • Forts
  • Tech
    • स्टार्टअप
    • Tech – तंत्रज्ञान
    • व्हिडिओ
  • Viral Topics
No Result
View All Result
Majhi Marathi
No Result
View All Result

जाणून घ्या ११ जून रोजी येणारे दिनविशेष

11 June Dinvishes

मित्रांनो, आज आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अस्थींचे त्यांच्या इच्छेप्रमाणे संपूर्ण देशभर विसर्जन करण्यात आले होते. ब्रिटीश कालीन भारतात जवाहरलाल नेहरू यांनी महात्मा गांधी यांच्या सोबत मिळून आपली देशाच्या स्वातंत्र्याकरिता अनेक चळवळी केल्या. त्यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारला अनेक वेळा याचना केल्या. जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडायची मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून संबोधित असतं. अश्या या महान नेत्याच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थ्या संपूर्ण भारतभर विसर्जित करण्यात आल्या.

तसचं, आज आपण या लेखाच्या माध्यमातून काही इतिहास कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या ११ जून रोजी येणारे दिनविशेष – 11 June Today Historical Events in Marathi

11 June History Information in Marathi
11 June History Information in Marathi

११ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 June Historical Event

  • इ.स. १८६६ साली इलाह्बाद उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्या न्यायालयाला पूर्वी आग्रा उच्च न्यायालय म्हणून संबोधले जात असे.
  • इ.स. १७७६ साली अमेरिका देशाला स्वातंत्र्य घोषित करण्यासाठी घोषणापत्र तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली.
  • सन १९२१ साली ब्राझील देशांतील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला.
  • सन १९५५ साली जगातील पहिल्या मैग्नेशियम जेट विमानाने भरारी घेतली.
  • सन १९६४ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या अस्थ्या संपूर्ण देशभर विसर्जित करण्यात आल्या.
  • सन १९८७ साली १६० वर्षाच्या कालखंडात ब्रिटीश देशाच्या पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा विराजमान होणाऱ्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर(Margaret Thatcher) या पहिल्या ब्रिटीश नागरिक ठरल्या.
  • सन २००८ साली भ्रष्ट्राचाराच्या आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या बांगलादेशाच्या पूर्व पंतप्रधान शेख हसीन वाजेद यांची सुटका करण्यात आली.

११ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 June Birthday / Jayanti / Birth Anniversary

  • इ.स. १८१५ साली प्रसिद्ध ब्रिटीश छायाचित्रकार ज्युलिया मार्गारेट कॅमेरून(Julia Margaret Cameron) यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८८० साली अमेरिकेचे पहिले संसद सदस्य रैफिन यांचा जन्मदिन.
  • इ.स. १८९४ साली जपानी व्यापारी व उद्योजक आणि टोयोडा लूम वर्क्सचे संस्थापक साकीची टोयोडा (Saki Toyoda)यांचे पुत्र किचीरो टोयोडा (Kiichiro Toyoda) यांचा जन्मदिन.
  • सन १९०९ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश व राजकारणी तसचं, निट्टे एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक के.एस. हेगडे यांचा जन्मदिन.
  • सन १९२४ साली भारतीय व्यंगचित्रकार, पत्रकार आणि लेखक अत्तूपुरथू मॅथ्यू अब्राहम उर्फ अबू अब्राहम यांचा जन्मदिन.
  • सन १९३७ साली पद्मभूषण व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय नर्तक, नृत्यदिग्दर्शक आणि शैक्षणिक तसचं, नालंदा नृत्य संशोधन केंद्राच्या संस्थापक-दिग्दर्शिका आणि मुंबईतील नालंदा नृत्य कला महाविद्यालयाच्या संस्थापक-प्राचार्या कनक रेले यांचा जन्मदिन.
  • सन १९४२ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय उत्प्रेरक वैज्ञानिक,  आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे माजी संचालक पॉल रत्नसामी (Paul Ratnasamy) यांचा जन्मदिन.
  • सन १९४८ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व बिहार राज्याचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्मदिन.
  • सन १९८९ साली भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी गिरीशचंद्र जोशी यांचा जन्मदिन.
  • सन १९९० साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हॉकी पटू सविता पुनिया यांचा जन्मदिन.

११ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 June Death / Punyatithi / Smrutidin

  • सन १९२४ साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, इतिहासकार, कादंबरीकार आणि नाटककार वासुदेव वामनशास्त्री खरे यांचे निधन.
  • सन १९५० साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी तसचं, भारतीय राष्ट्रीय शिक्षक म्हणून ओळखले लोकप्रिय असणारे पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांचे निधन.
  • सन १९८३ साली प्रख्यात भारतीय उद्योजक व व्यावसायिक तसचं, बिर्ला समूहाचे संस्थापक घनश्यामदास बिडला यांचे निधन.
  • सन १९९७ साली भारतीय सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय दूर अंतरीय जलतरणपटू आणि व्यावसायिक तसचं, इग्लिश खाडी पार करणारे पहिले भारतीय नागरिक मिहीर सेन यांचे निधन.
  • सन २००० साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे नेता व राजकारणी तसचं,  माजी भारतीय वायुसेना दल अधिकारी व वैमानिक स्क्वॉड्रॉन लीडर राजेश पायलट यांचे निधन.
Previous Post

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश, मॅसेज आणि कोट्स

Next Post

भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन् चन्द्रशेखर

Editorial team

Editorial team

Related Posts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती
Forts

गोव्यातील किल्ल्यांची माहिती

Goa Killa भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात लहान राज्य म्हणजे गोवा. गोव्याचे एकूण क्षेत्रफळ 3072 चौ.कि.मी. आहे. या राज्यांत दोनच जिल्हे...

by Editorial team
July 10, 2022
पेमगिरी किल्ला माहिती
Forts

पेमगिरी किल्ला माहिती

Pemgiri Killa महाराष्ट्रातील अनेक किल्ले स्वराज्य बांधणीच्या अनुभवाचे साक्षीदार आहेत. स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना जवळून पाहणाऱ्या अशाच अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला...

by Editorial team
July 10, 2022
Next Post
Subrahmanyan Chandrasekhar Information in Marathi 

भारतीय सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सुब्रह्मण्यन् चन्द्रशेखर

Jobs for the Future

भविष्यात या क्षेत्रांतील लोकांना असेल नोकरी करिता जास्त मागणी

12 June History Information in Marathi

जाणून घ्या १२ जून रोजी येणारे दिनविशेष

Panhala Fort Information In Marathi

पन्हाळगड किल्ला इतिहास

Difference between AC and DC Current

AC करंट आणि DC करंट मध्ये काय अंतर असतो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook Twitter Youtube

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved

No Result
View All Result
  • Home
  • Information
  • History
  • Marathi Biography
  • Viral Topics
  • Startup
    • Self Help

Copyright © 2016-2021, MajhiMarathi.Com, All rights reserved